धुळ्यातील कांती कॉम्पलेक्सला आग, नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 11:52 IST2020-02-28T11:51:36+5:302020-02-28T11:52:04+5:30
दोन बंब दाखल : पोलीस ठाण्यात नोंदीचे काम सुरु

धुळ्यातील कांती कॉम्पलेक्सला आग, नुकसान
धुळे : धुळ्यातील गल्ली नंबर ४ मध्ये असलेल्या कांती कॉम्पलेक्समध्ये अचानक दोन दुकानांना आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली़ आगीची घटना लक्षात येताच महापालिकेच्या दोन बंबांनी आग आटोक्यात आणली़ दोन दुकानांपैकी एक गादीचे तर दुसरे मोबाईलचे होते़ यात हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे़ या कॉम्पलेक्सच्या मागील बाजुस कचरा होता़ या कचऱ्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर आझादनगर पोलीस दाखल झाले होते़