धुळ्यात चाळीसगाव रोडवर आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 13:01 IST2018-12-14T12:59:52+5:302018-12-14T13:01:42+5:30
आगीचे कारण गुलदस्त्यात : अग्नीशमन बंबासह पोलीस दाखल

धुळ्यात चाळीसगाव रोडवर आग
ठळक मुद्देचाळीसगाव रोडवर लागली आगआगीचे कारण आणि नुकसान अद्यापही अस्पष्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील चाळीसगाव रोडवरील कब्रस्तानच्या पुढे असलेल्या दुकान वजा घराला आग लागली़ ही घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास लागली़ आगीची घटना लक्षात येताच अग्नीशमन बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे काम सुरु झाले आहे़ पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली असून आग नेमक्या कोणत्या कारणाने लागली, आगीत कितीचे नुकसान झाले हे मात्र अजून अस्पष्ट आहे़ आग लागल्याच्या ठिकाणी परिसरातील नागरीकांनी गर्दी केली आहे़