Find those responsible for the death | मृत्यूस जबाबदार असणाºयांना शोधा
मृत्यूस जबाबदार असणाºयांना शोधा

धुळे : तालुक्यातील मोरशेवडी येथील विवाहितेच्या आत्महत्येस जबाबदार असणाºयांवर कारवाई करावी, या मागणीसाठी तिच्या माहेरकडील नागरीकांनी पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांची भेट घेतली़ पोलीस अधीक्षक कार्यालयात निदर्शने देखील करण्यात आली़ 
धुळ्यातील मोगलाई, गवळीवाड्यातील लक्ष्मीनगरात राहणारे अतुल तुकाराम गवळी यांची मुलगी शितल हिचा विवाह धुळे तालुक्यातील मोरशेवडी येथील किसन लक्ष्मण काटकर यांच्या मुलासोबत १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झाला होता़ तिला सासरी त्रास होत असल्याच्या कारणावरुन तिने २ डिसेंबर रोजी मोरशेवडी येथील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली़ तिला सासरी छळ होत असल्याची फिर्याद धुळे तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे़ 
या प्रकरणातील जे आरोपी आहेत ते आजही मोकाट फिरत आहेत़ त्यांना पकडून त्यांना शिक्षा झाली पाहीजे अशी मागणी करीत शितलच्या माहेरकडील नागरीकांनी पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांची भेट घेतली़ त्यांच्याशी संवाद साधत निवेदन देखील सादर केले़ यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालय आवारात बहुसंख्य नागरीकांनी निदर्शने केली़

Web Title: Find those responsible for the death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.