अखेर वीज तारा बदलण्यास सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 12:55 IST2020-03-06T12:55:18+5:302020-03-06T12:55:55+5:30
उपोषणाचा दिला होता इशारा : रहिवाशांमधून समाधान व्यक्त

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
साक्री : प्रभाग क्रमांक तीनमधून जाणारी उच्चदाब वाहिनी तात्काळ स्थलांतरित करण्यासोबत अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला लोंबकळणाऱ्या आणि सतत तुटणाºया वीज तारांचा प्रश्न तत्काळ सोडवावा, तसे न झाल्यास प्रभागातील नागरिकांसमवेत उपोषणचा इशारा प्रभागाच्या नगरसेविका अॅड.पूनम काकुस्ते-शिंदे यांच्यासह प्रभागातील रहिवाशांनी येथील वीज वितरण कंपनीचे अभियंता वाय.डी. गिरासे यांना लेखी निवेदन देत दिला होता. त्याची दखल घेत गुरुवारी प्रभागातील नागाई कॉलनी परिसरातील वीजतारा बदलण्याच्या कामास वीज वितरण कंपनीने सुरुवात केली आहे. यामुळे रहिवस्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान काही दिवसापूर्वी नागाई कॉलनी परिसरातीत पापड तयार करण्यासाठी बसलेल्या महिलांच्या शेजारी अचानक वीजतार तुटली होती. मात्र ती वरतीच अडकून राहिल्यामुळे यावेळी मोठी दुर्घटना होताना वाचली. यावर परिसरातील महिलांनी तसेच नगरसेविका अॅड.पूनम काकुस्ते यांनी तीव्र रोष व्यक्त करीत अभियंता गिरासे यांना प्रत्यक्ष वस्तुस्थिती दाखवून दिली होती. यावर गिरासे यांनी लेखी देत आठ दिवसाच्या आत तारा बदलण्याचे लेखी आश्वासन दिले होते. अखेर गुरुवारी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. यावेळी कॉलनी परिसरातील लताबाई भोसले, विजया अहिरराव, पूर्वा गायकवाड, गंगाबाई चव्हाण, लिलावती देसले, शितल पवार, माया पवार, करुणा पाटील, बालुबाई गिरासे, कुसुम भामरे, उज्वला पाटील, बेबीबाई सोनवणे, सुनंदा भदाने, निर्मला पाटील, संगीता सुर्यवंशीआदि महिला उपस्थीत होत्या.