अखेर लोंबकळणाºया तारा दुरुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 22:44 IST2019-07-25T22:44:28+5:302019-07-25T22:44:47+5:30
अनेकवेळा तक्रारी : ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त

सुन्नी जामा मशिद गल्लीतील दुरुस्त केलेल्या विद्युत तारा.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालपूर : येथील विद्युत वितरण कंपनीे सुन्नी जामा मशिद गल्लीतील लोंबकळणाºया तारा दुरुस्त केल्या. यामुळे मालपूर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
येथे लोंबकळणाºया विद्युत तारा, गल्लीच्या मध्यभागी विद्युत पोल आदी गंभीर समस्यांविषयी ‘लोकमत’ने सतत पाठपुरावा करत विषयाला वाचा फोडली. याची दखल घेत विद्युत वितरण कंपनीने सुन्नी जामा मशिद गल्लीतील विद्युत तारा ताणून पोल देखील व्यवस्थीत केल्यामुळे तेथील ग्रामस्थांनी ‘लोकमत’चे कौतुक करुन आभार व्यक्त केले. सोशल मिडीयाच्या माध्यमातून संपूर्ण गावकºयांनी या कामाला शुभेच्छा दिल्या.
येथील तारा म्हणजे अपघाताला निमंत्रण देणेच होते. जमिनीवरुन सहज हातवर केला तरी स्पर्श होईल तर घराजवळील गॅलरीला लागून या तारा होत्या. नजरचुकीने स्पर्श झाला तरी जीवाला मुकावे लागणार होते. खूप दिवसापासून हा विषय रखडत होता. अनेकदा तक्रार करुन देखील मार्गी लागत नव्हता. तसेच ‘लोकमत’मधून वारंवार यावर प्रकाशझोत टाकल्यामुळे विषय मार्गी लागला असे येथील ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया दिसून येत आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराज चौका जवळील दोन्ही विद्युत खांब हे रस्त्याच्या मध्यभागी येत असून हा विषय देखील मार्गी लावावा, अशी येथील नागरिकांची अपेक्षा आहे.