ऊर्जामंत्र्यांसह महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:46 IST2021-02-05T08:46:12+5:302021-02-05T08:46:12+5:30
धुळे : कोरोनाकाळात अनेकांचे राेजगार बंद पडल्याने उपासमारीला सामाेरे जावे लागले होते. त्यामुळे महावितरण कंपनीकडून वीज मीटरचे रिडिंग न ...

ऊर्जामंत्र्यांसह महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा
धुळे : कोरोनाकाळात अनेकांचे राेजगार बंद पडल्याने उपासमारीला सामाेरे जावे लागले होते. त्यामुळे महावितरण कंपनीकडून वीज मीटरचे रिडिंग न घेता अंदाजे वाढीव वीज बिलांची आकारणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांना बिल भरण्यासाठी कंपनीकडून मानसिक त्रास व आर्थिक शोषण केले जात आहे. या कारणीभूत असलेले राज्याच्या ऊर्जामंत्र्यासह महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्रातील जनतेस कोरोनाकाळातील भरमसाठ वाढीव वीज बिल माफीसंदर्भात वीजबिल माफी करण्याबाबत सरकारकडून केवळ आश्वासने देत दिशाभूल केली जात आहे. वीज वितरण कंपनीचे संचालक मंडळाकडून जनतेस मानसिक क्लेश आर्थिक लुबाडणूक व खोटी आश्वासने देऊन ते न पाळण्याने केलेली फसवणूक यासंदर्भात गुन्हा दाखल होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात राज ठाकरे यांच्या आदेशान्वये पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. यावेळी मनसे धुळे जिल्हाध्यक्ष ॲड. दुशंत देशमुख, जिल्हा सचिव अजितसिंह राजपूत, संतोष मिस्त्री, रोहित नेरकर, दीपक पाटील, राजेश दुसाने , नीलेश गुरव, साहिल खान, जगदीश गवळी, बापू ठाकूर, हेमंत हरणे, अक्षय शिंदे, प्रज्वल चव्हाण, विपुल निकम, गोपाल गवळी, विष्णू मासाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.