टेकवाडे शिवारात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 22:15 IST2021-01-07T22:15:06+5:302021-01-07T22:15:33+5:30
परस्पर विरोधी फिर्याद दाखल

टेकवाडे शिवारात हाणामारी
धुळे : शेतात जाण्याचा कच्चा रस्ता ओला करुन टाकल्याने बैलगाडी, ट्रॅक्टर नेण्यास त्रास होतो असे म्हणत जाब विचारण्यावरुन हाणामारी झाल्याची घटना बुधवारी शिरपूर तालुक्यातील टेकवाडे शिवारात घडली. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्याद दाखल करण्यात आली. शिरपूर तालुक्यातील टेकवाडे येथील सदाशिव विठाराम वाडीले यांनी एका गटाकडून फिर्याद दाखल केली. त्यानुसार, ६ जानेवारी रोजी दुपारी मुन्ना मधुकर चौधरी आणि मधुकर वेडू चौधरी या दोघांनी वाद घालत हातातील लोखंडी सळईने मुन्ना चौधरीला पाठीवर, हातावर, पायावर बेदम मारहाण केली. शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दोघा बाप-बेट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या गटाकडून मधुकर वेडू चौधरी यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, ६ जानेवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास टेकवाडे शिवारातील शेतात कांतीलाल मधुकर भोई, भुरा मधुकर भोई, सदाशिव मिठाराम भोई यांनी गाऱ्हाणे केल्याचा राग मनात धरुन शिवीगाळ करीत हाताबुक्याने मारहाण केली. जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यावरुन तिघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.