बचत गटाच्या हप्तावरुन लोणखेडीत हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 22:17 IST2020-08-09T22:16:54+5:302020-08-09T22:17:15+5:30
परस्पर विरोधी फिर्याद : ५ जणांविरुध्द गुन्हा

बचत गटाच्या हप्तावरुन लोणखेडीत हाणामारी
धुळे : बचत गटाच्या हप्त्यावरुन धुळे तालुक्यातील लोणखेडीत गावात हाणामारीची घटना ८ आॅगस्ट रोजी सकाळी घडली़ याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाल्याने ५ जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला़
एका फायनान्स बचत गटातून एक वर्षापुर्वी ३० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते़ दर महिन्याला ५०० रुपयांप्रमाणे ती महिला कर्जाचे हप्ते भरत होती़ परंतु गेल्या चार महिन्यांपासून कोरोना आजारामुळे त्यांना मजुरीचे काम मिळत नसल्याने बचत गटाचे हप्ते भरता आलेले नाही़ हप्ताची मागणी केली असता माझे पती घरी नाही, ते आल्यावर पैसे देते असे सांगितल्याचा राग आल्याने तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य झाले़ तिच्यावर दगड फेकून मारण्यात आला़ लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने पाठीला दुखापत झाली़ तिला शिवीगाळ सह हाताबुक्याने मारहाण झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती़ ही घटना ८ आॅगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली़ या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरुन तीन जणांविरुध्द रात्री सव्वा नऊ वाजता गुन्हा दाखल झाला़ यात दोन महिलांसह एका पुरुषाचा समावेश आहे़
दुसऱ्या गटाकडूनही महिलेनेच फिर्याद दाखल केली आहे़ त्यानुसार, बचत गटाचे हप्ते गोळा करीत असताना एका महिलेने बचत गटाचे हप्ते भरलेले नसल्याने हप्ते केव्हा भरणार अशी विचारणा करण्यात आली़ त्याचा राग आल्याने जातीवाचक शिवीगाळ झाल्याचा प्रकार घडला़ हाताबुक्याने मारहाण करण्यात आली़ या घटनेत गळ्यातील ५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत गहाळ झाल्याने नुकसान झाले आहे़ फोन करुन मुलीला बोलाविल्याने तिलाही मारहाण करण्यात आली़ लाकडी दांडक्याचा यावेळी सर्रासपणे वापर झाला़ ही घटना ८ आॅगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास लोणखेडी गावात घडली़ याप्रकरणी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास महिलेने फिर्याद दाखल केल्याने दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला़