दोघांमध्ये हाणामारी, परस्परविरोधी फिर्याद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:42 IST2021-02-17T04:42:42+5:302021-02-17T04:42:42+5:30

शहरातील चैनी रोड भागात लोटगाडी लावून व्यवसाय करणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी आहे. या ठिकाणी वाहनधारक आणि लोटगाडीचालक यांच्यात कायम वाद ...

Fighting between the two, conflicting lawsuits | दोघांमध्ये हाणामारी, परस्परविरोधी फिर्याद

दोघांमध्ये हाणामारी, परस्परविरोधी फिर्याद

शहरातील चैनी रोड भागात लोटगाडी लावून व्यवसाय करणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी आहे. या ठिकाणी वाहनधारक आणि लोटगाडीचालक यांच्यात कायम वाद होत असतात. काही वाद हे जागेवर मिटविले जातात तर काही वाद हे थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचतात. परिणामी, वादाच्या या घटनेमुळे काही वेळेस तणावदेखील होत असताे. असाच काहीसा प्रकार सोमवारी सायंकाळी घडला. शहरातील चैनी रोड भागात गुलशन बीअर बारसमोर वाहनचालक आणि लोटगाडीधारक यांच्यात वाद झाला. या वादाचे पडसाद हाणामारीत झाल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या वादानंतर दोन्हीही हाणामारी करणाऱ्यांनी थेट आझादनगर पोलीस ठाणे गाठत परस्परविरोधी फिर्याद दाखल केली.

त्यानुसार, राहुल भिका जयस्वाल (२९, रा. चैनी रोड, धुळे) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून संशयित तोहीद रशिद सय्यद (रा. गरीब नवाज नगर, धुळे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर, याच प्रकरणी दुसऱ्या गटाकडून तोहीद रशिद सय्यद (२१, रा. गरीब नवाज नगर, धुळे) याने दाखल केलेल्या फिर्यादीवरून संशयित जयस्वाल (पूर्ण नाव माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. या दोन्ही घटनांचा तपास आझादनगर पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title: Fighting between the two, conflicting lawsuits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.