कोरोनात मयत पालकांच्या पाल्यांना फीमध्ये सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:23 IST2021-07-19T04:23:26+5:302021-07-19T04:23:26+5:30
निजामपूर जैताणे ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोदचंद्र शाह, सचिव लक्ष्मीकांत शाह यांच्या उपस्थितीत ग्रामविकास प्रतिष्ठानची दि १५ रोजी विशेष सभा ...

कोरोनात मयत पालकांच्या पाल्यांना फीमध्ये सवलत
निजामपूर जैताणे ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोदचंद्र शाह, सचिव लक्ष्मीकांत शाह यांच्या उपस्थितीत ग्रामविकास प्रतिष्ठानची दि १५ रोजी विशेष सभा झाली. यावेळी सुमंतकुमार शाह, मोहन सूर्यवंशी, दुल्लभ जाधव, भिकनलाल जयस्वाल, वासुदेव बदामे, प्राचार्य मनोज भागवत, मुख्याध्यापक ललित सोनवणे उपस्थित होते. निजामपूर निजामपूर जैताणे ग्रामविकास प्रतिष्ठानच्या श्रीमती भानुबेन वाणी पब्लिक स्कूल व श्रीमती आशुमतीबेन चंपकलाल शाह विद्यालयाच्या शैक्षणिक संकुलात इयत्ता १ ली ते १० वी पर्यंत विद्यार्थी शिकतात.
निजामपूर जैताणेसह परिसरातील कोरोना महामारीमध्ये ज्यांनी आई, वडील, कुटुंबातील कर्ता व्यक्ती गमावला, ज्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले त्या मुलांना या संस्थेत शैक्षणिक नुकसान केवळ पैशांअभावी होऊ नये यासाठी ग्रामविकास प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाने ठराव पारित करून शैक्षणिक शुल्क ५० टक्के सवलत देऊन त्या कुटुंबातील विद्यार्थ्यांचे पहिली ते दहावीपर्यंतच्या शिक्षणाला शैक्षणिक मदत म्हणून या इंग्रजी व मराठी माध्यमिक विद्यालयातून शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती ग्रामविकास प्रतिष्ठानतर्फे देण्यात आली आहे.