लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : कोरोनाने घातलेला धुमाकूळ व शहरातील गावाकडे येणारी गर्दी बघून ग्रामीण भागातील नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. शेतकरी कुटुंबे गाव सोडून शेतात जाऊन राहत आहेत. तालुक्यातील रोहिणी गाव परिसरात असे चित्र पहावयास मिळत आहे़कोरोना रुग्णांचा रोज वाढता आकडा बघून शासनाने राज्यात संचारबंदी लागू केली़ शहरात कामासाठी, व्यवसासाठी अनेक नागरिक विविध राज्ये तसेच पुणे, मुंबई, औरंगाबाद येथे गेले होते. ते गावाकडे परत येत आहेत, अश्या लोकांची प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून गावात येत असले तरी विषाणूची लक्षणे लवकर दिसत नाहीत़ गावात राहत असल्यास एकमेकांच्या संपर्कात माणूस येतोच. त्यापेक्षा आपल्या शेतात राहिलेले बरे, असं म्हणत गावातले लोक शेतात जाऊन वास्तव्य करीत आहेत.अनेकदा दुष्काळातही नागरिकांनी गावं सोडली आहेत, गावात दुष्काळ पडला की लोकं शेतात राहायला जात असत. त्यामुळे एकतर खाण्यात वाटेकरी कमी होत आणि गरजा कमी झाल्यामुळे संपूर्ण कुटूंबाची गरज भागून जाई. तसेच १९७२ च्या दुष्काळातही लोकांनी गाव सोडून शेतात बिºहाड थाटले. काही जण दुष्काळ संपल्यानंतर गावात परत आले. पण बहुतांश लोक शेतातच स्थायिक झाले. अश्या परिस्थिती असल्याने आताही तसंच होऊ लागले आहे़ लोक शेतात राहत आहेत़
कोरोनाच्या भीतीने कुटुंब शेताकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 22:12 IST