विद्यापीठस्तरीय क्रिकेट सामन्यात फैजपूर विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 22:37 IST2019-02-28T22:36:32+5:302019-02-28T22:37:06+5:30

बोराडी : आयोजक महाविद्यालयाचा संघ ठरला उपविजेता

Fazpur won the university's cricket match | विद्यापीठस्तरीय क्रिकेट सामन्यात फैजपूर विजयी

dhule

शिरपूर : तालुक्यातील बोराडी येथील अहिल्याबाई होळकर फार्मसी महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत फैजपूर येथील संघाने विजेते पद पटकाविले तर उपविजेता बोराडी येथील संघ ठरला़
गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्र राज्य ड्रगीस्ट आणि केमिस्ट असोसिएशनच्यावतीने कवयित्री बहीणाबाई चौधरी विद्यापीठस्तरीय विश्वाई फार्माकप २०१९ क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात नगाव, शिरपूर, नंदुरबार, साकेगाव, चोपडा, जळगाव, फैजपुर येथून ११ संघ सहभागी झाले होते़
२७ रोजी अंतिमपूर्व सामना आर.सी.पटेल कॉलेज आॅफ फार्मसी शिरपूर विरूध्द बोराडी यांच्यात झाला़ त्यात इन्स्टिट्यूट आॅफ फार्मसी एज्युकेशन बोराडी विजयी झाल्यामुळे अंतीम सामन्यात प्रवेश मिळविला़ त्यामुळे अंतिम उत्कंठावर्धक सामना लोकसेवक मधुकरराव चौधरी कॉलेज आॅफ फार्मसी फैजपूर व इन्स्टिट्यूट आॅफ फार्मसी एज्युकेशन बोराडी यांच्यात झाला़ त्यात फैजपुर संघ विजयी झाला. केमिस्ट असोसिएशनच्यावतीने विजेत्या संघास रोख ५ हजार रूपये व ट्रॉफी तर उपविजेता संघास रोख ३ हजार रूपये व ट्रॉफी देण्यात आली.
विजेता व उपविजेता संघाला किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ़तुषार रंधे यांच्या हस्ते ट्रॉफी देवून गौरविण्यात आले़ यावेळी संस्थेचे सदस्य शामकांत पाटील, विश्वाई क्लबचे अध्यक्ष शशांक रंधे, डॉ.विकास पाटील, प्राचार्य डॉ.पी.एच.पाटील, प्रा.कल्पेश वाघ आदी उपस्थित होते. सामने पाहण्यासाठी बोराडी परिसरातील विद्यार्थी, तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समन्वयक प्रा.कल्पेश वाघ, रविकिरण सुर्यवंशी, भुषण कढरे, वाल्मिक वाघ व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतलेत़ सुत्रसंचालन भुषण भदाणे, स्वप्निल हीरे यांनी केले.

Web Title: Fazpur won the university's cricket match

टॅग्स :Dhuleधुळे