साक्री तालुक्यात बापाने केला मुलाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 11:53 IST2020-03-23T11:52:21+5:302020-03-23T11:53:53+5:30
अर्वाच्च बोलण्याचा राग, निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा

साक्री तालुक्यात बापाने केला मुलाचा खून
निजामपूर : जन्मदात्या आईबद्दल संतापजनक वक्तव्य करणाऱ्या विकृत मुलाचा बापाने खून केल्याने खळबळ उडाली आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साक्री तालुक्यातील इंदवे गावात शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमाराला ही घटना घडली़
योगेश देविदास वाघ (वय ४०) याने नविन बांधकाम सुरू असलेल्या घराचा दुसरा मजला पाहिजे अशी मागणी केली़ तसेच आईबद्दल अतिशय आक्षेपार्ह विधान केले़ याचा राग आल्याने त्याचे वडील देविदास सिताराम वाघ याने बांधकामाच्या लाकडी फळीच्या सहाय्याने डोक्यावर मारहाण करुन जीवे ठार मारले़ त्यानंतर बांधकाम सुरू असलेल्या घराच्या दुसºया मजल्यावरुन खाली पडल्याचा बनाव त्याने केला़ तसेच घटनास्थळी पडलेल्या रक्तावर शेण टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला़ परंतु हा बनाव उघड झाला़
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक एस़ के़ शिरसाठ यांनी घटनास्थळी भेट देवून पाहाणी केली़
याप्रकरणी इंदवे गावाचे पोलिस पाटील संतोष रतन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन देविदास वाघ याच्याविरुध्द निजामपूर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास एपीआय शिरसाठ करीत आहेत़
या घटनेमुळे साक्री तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे़