नियमित कर्ज फेड करणारे शेतकरी वंचीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 12:54 IST2020-03-04T12:54:25+5:302020-03-04T12:54:54+5:30

नेर परिसरात नाराजी : न्याहळोद येथील शेतकऱ्यांना ठेंगा, शासनाने शेतकऱ्यांची दखल घेण्याची होतेय मागणी

Farmers who pay regular loans | नियमित कर्ज फेड करणारे शेतकरी वंचीत

dhule


लोकमत न्यूज नेटवर्क
नेर/न्याहळोद : येथील ज्या शेतकºयांची कर्ज माफी झाली ते समाधानी आहेत. पण जे नियमितपणे कर्ज फेड करीत आहेत त्यांना मात्र काहीच देण्यात आले नाही. त्यामुळे नियमितपणे कर्ज फेड करून आम्ही पाप केले का? असा संतप्त सवाल नियमित कर्ज फेड करणारे शेतकरी उपस्थित करीत आहेत. त्यामुळे शासनाने या शेतकºयांचाही विचार करून त्यांना ही दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
नेरसह भदाणे, खंडलाय खुर्दे, खंडलाय बुद्रुक, खंडलाय बांबुर्ले, शिरधाणे, अकलाड, मोराणे, लोणखेडी, लोहगड, नांद्र्रे, उभंड, देऊर खुर्द, देऊर बुद्रुक, पिंपरखेड येथील नागरीकांचा शेती व्यवसाय हा पारंपरिक आहे. ज्या शेतकºयांनी गावातील सेंट्रल बँक, सोसायटीत थकीत राहू नये, तसेच कर्ज फेडण्याची परिस्थीती नसतांना अतिवृष्टी, महापूर यात सगळे काही वाहून गेले तरीही काही करुन कर्ज फेडले. पोटाची खळगी भरण्यासाठी जमा केलेले पैसे देऊन, कमी पडत असतील उसनवार, घरातील महिलांच्या अंगावरील दागिने गहाण किंवा बँकेत तारण ठेऊन किंवा सोनाराकडे दागिणे मोडून घेतलेल कर्ज फेडले.
त्याचप्रमाणे परत आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी परिस्थितीनुसार दुसरे कर्ज घेतले आणि ते ही दरवर्षी नियमित बँकेत ठरवलेल्या हप्त्यात जमा करीत आहेत. मात्र त्यांना कर्ज माफीचा कोणताही फायदा झाला नाही. त्यामुळे मागील तसेच आताचे कर्ज माफीपासून वंचित राहीलेल्या शेतकºयांना न्याय कधी मिळणार? असा सवाल केला जात आहे. जे शेतकरी नियमीत कर्ज घेतात आणि नियमीत हप्ते भरतात त्या शेतकºयांना दुप्पट कर्ज माफी मिळायला हवी होती, अशी अपेक्षा शेतकºयांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Farmers who pay regular loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे