सिंचन भवनात शेतकऱ्यांचा आत्महत्येचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 22:43 IST2020-03-03T22:43:01+5:302020-03-03T22:43:23+5:30
कनोली पाटचारीतून पाणी सोडा : आत्मदहनासाठी आणले इंधन, गळफाससाठी बांधला दोर

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : कनोली पाटचारी क्रमांक तीनमधून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मंगळवारी धुळे तालुक्यातील तरवाडे, नाणे, विंचूर येथील बागायतदार शेतकऱ्यांनी सिंचन भवनात येवून टोकाची भूमिका घेतल्याने अधिकारी, कर्मचाºयांची तारांबळ उडाली़
कनोली पाटचारीतून येणाºया पाण्याच्या भरवशावर येथील शेतकºयांनी रब्बी पिकांची पेरणी केली़ परंतु पाटचारी दुरूस्तीच्या नावाखाली सिंचन विभागाने पाणी सोडले नाही़ त्यामुळे पिके करपून लागली असून नुकसान होत आहे़ या पाटचारीतून त्वरीत पाण्याचे आवर्तन सोडावे अशी वेळावेळी मागणी करण्यात आली़ परंतु सिंचनच्या अभियंत्यांनी दखल घेतली नाही़ त्यामुळे कंटाळलेल्या शेतकºयांनी मंगळवारी सिंचन भवन गाठले़ यावेळी शेतकºयांनी आत्मदहनाचा प्रयत्न करण्यासाठी सोबत इंधनाचा कॅन आणला होता़ तसेच कार्यालयाच्या छताला गळफास घेण्यासाठी दोर बांधला आणि कार्यालयातच आत्महत्या करण्याचा ईशारा दिला़ त्यामुळे सिंचन भवनातील कर्मचाºयांची एकच तारांबळ उडाली़ धक्कादायक बाब म्हणजे जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हते़ तब्बल तीन तासांच्या प्रतिक्षेनंतर कार्यकारी अभियंत्यांनी शेतकºयांचे म्हणणे ऐकून पाणी सोडण्याचे आश्वासन दिले़ त्यावेळी शेतकरी परतले़ शेतकºयांनी निवेदन दिले असून त्यावर शिवाजी माळी, ज्ञानेश्वर माळी, आनंदसिंग देवरे, शानाभाऊ राजपूत, रवींद्र पाटील, गुलाब पाटील, भटू पाटील, दगडू माळी, राकेश वाघ, संतोष राजपूत, बापू माळी, दिलीप राजपूत, विजय पाटील, सुभाष वाघ, पुरूषोत्तम देवरे यांच्यासह ३३ शेतकºयांच्या सह्या आहेत़