शेतकºयांची सरसकट कर्जमुक्ती झाली पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 23:05 IST2019-03-19T23:03:26+5:302019-03-19T23:05:33+5:30
धरणे : सत्यशोधक शेतकरी सभेची मागणी

शेतकºयांची सरसकट कर्जमुक्ती झाली पाहिजे
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शेतकºयांची सरसकट कर्जमुक्तीसह विविध मागण्या प्रशासनाने पूर्ण कराव्यात या मागणीसाठी सत्यशोधक शेतकरी सभेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले़ तत्पुर्वी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन देण्यात आले़
विविध मागण्यांमध्ये प्रामुख्याने सरसकट कर्जमुक्ती जाहीर करावी यासह वन हक्क कायदा २००६ ची अंमलबजावणी, रेडिरेकनरनुसार कर्ज उपलब्ध करा, दुधाचा रास्त भाव, शेतीसाठी वीज मोफत अशा विविध मागण्यांचा समावेश होता़ सुभाष काकुस्ते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनात शेतकरी सहभागी होते़