शेतकरी आज इंदौरकडे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 21:51 IST2020-12-23T21:50:51+5:302020-12-23T21:51:13+5:30
शिरपूर : केंद्र सरकारने केलेल्या ३ नवीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या सीमांवर पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांनी गेल्या ...

dhule
शिरपूर : केंद्र सरकारने केलेल्या ३ नवीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या सीमांवर पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांनी गेल्या महिनाभरापासून आंदोलन सुरू केले आहे़ या आंदोलना पाठींबा देण्यासाठी मंगळवारी सायंकाळी उशिरा जाहिर सभा होवून ते शेतकरी २३ रोजी सकाळी इंदौरकडे रवाना होणार आहेत़
नाशिक येथून निघालेले शेतकरी इंदौरकडे मार्गस्थ होत असतांना २२ रोजी सायंकाळी उशिरा शिरपूर शहरात आगमन झाले़ त्यानंतर शहरातील पाचकंदिल चौकात जाहिर सभा झाली़ या जाहीर सभेस माजी आमदार जे़पीग़ावित, किसान सभेचे किसन गुजर, डॉ़अजित नवले, कॉम्रेड राजू देसले व कामगार नेते यांनी सभेला संबोधित केले़ केंद्र सरकारने तयार केलेल्या नवीन कायद्यामुळे भविष्यात शेती व्यवसाय धोक्यात येणार आहे़ शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी गोरगरिबांवर छोट्या व्यापाऱ्यांनाही या कायद्याची जरब बसणार असून भांडवलदारांचे या कायद्यामुळे भले होणार आहे. त्यामुळे या कायद्याला विरोध करण्यासाठी व दिल्लीकडे निघालेल्या महाराष्ट्रातील शेतकºयांच्या त्याला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पक्षांनी आपापले मतभेद बाजूला ठेवून पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला़
यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष मनोहर पाटील, अभिमन भोई, शहराध्यक्ष उत्तमराव माळी, शेतकरी विकास फाऊंडेशनचे तालुका अध्यक्ष मोहन पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख भरतसिंह राजपूत, शहर प्रमुख मनोज धनगर, प्रेमकुमार चौधरी, राष्ट्रवादीचे रमेश करंकाळ, डॉ़मनोज महाजन, भाकपचे तालुका सेक्रेटरी अॅड़संतोष पाटील, अॅड़मदन परदेशी, अॅड़सचिन थोरात, किसान सभा जिल्हाध्यक्ष अॅड.हिरालाल परदेशी, किशोर सूर्यवंशी, शाहिर प्रविण पाणपाटील, विजय अहिरे, क्रांती पाणपाटील, सत्यशोधक जन आंदोलन राज्य उपाध्यक्ष कॉ.दत्ता थोरात, सत्यशोधक विद्यार्थी संघटना राज्य सदस्य सतिष खैरनार, सत्यशोधक शेतकरी सभा कचरु अहिरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते़