नापीकीच्या नैराश्यातून शेतक:याची आत्महत्या
By Admin | Updated: June 2, 2017 12:54 IST2017-06-02T12:54:44+5:302017-06-02T12:54:44+5:30
मेथी येथील घरी घेतला गळफास

नापीकीच्या नैराश्यातून शेतक:याची आत्महत्या
ऑनलाईन लोकमत
शिंदखेडा,दि.2- नापिकी व त्यातून आलेल्या नैराश्यातून मेथी येथील सुरेश मन्साराम माळी यांनी 31 रोजी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
मेथी गावात सुरेश माळी यांच्या घरासमोरच्या कुटुंबात लगA होते. हे लगA परगावी असल्याने सुरेशची प}ी कविता आणि मुले ही लग्नासाठी गेले होते. कविता जेव्हा लगA आटोपून सायंकाळी घरी परतली त्यावेळी सुरेशने गळफास घेतल्याची बाब उघडकीस आली. यासंदर्भात मेथी येथील माजी सरपंच भाईजी माळी यांनी शिंदखेडा पोलिसांना खबर दिली.
सुरेशकडे तीन बिघे जमीन असून गेल्या दोन वर्षापासून सततची नापीकी तसेच खरीप हंगामामध्ये आवश्यक बियाण्यासाठी होणारी कुतरओढ यामुळे तो तणावात होता. त्यातूनच त्यानी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. सुरेश यांच्या पश्चात प}ी कविता व नंदिनी , गौरव आणि साई ही तीन मुले आहेत.