शेतकऱ्याला भर दुपारी रस्त्यात अडवून केली लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:34 IST2021-08-29T04:34:32+5:302021-08-29T04:34:32+5:30
या प्रकरणी जखमी शेतकरी नवल कारभारी पाटील (५०, रा. बेहेड, ता. साक्री) हे शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास साथीदार ...

शेतकऱ्याला भर दुपारी रस्त्यात अडवून केली लूट
या प्रकरणी जखमी शेतकरी नवल कारभारी पाटील (५०, रा. बेहेड, ता. साक्री) हे शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास साथीदार चुडामण कौतिक गर्दे यांच्यासोबत नेर गावातील पेट्रोल पंपाजवळून जात असताना पाठीमागून मोटारसायकलीवरून आलेल्या तिघांनी त्यांना अडविले. रस्त्याच्या बाजूला होण्यास सांगितले. दिनेश माणिक बागले याने खिशातील लोखंडी फाईट काढून त्याच्याने नवल पाटील यांच्यावर हल्ला केला. तोंडावर, छातीवर आणि हाता-पायावर मारहाण केली. या वेळी त्यांच्या सोबत असलेल्या चुडामण गर्दे यास चाकूचा धाक दाखवून त्यांना बाजूला केले. दिनेश आणि माणिक यांनी नवल पाटील यांच्या खिशातील २५ हजारांची राेक रक्कम, मोबाइल आणि गळ्यातील ६ ग्रॅमची सोन्याची चेन असा एकूण ३७ हजारांचा ऐवज जबरीने काढून घेतला. यानंतर तिघांनी मारहाण केली. या वेळी लोकांची गर्दी होत असल्याचे पाहून तिघे मोटारसायकलीवर बसून पळून गेले.
या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात माणिक उखा बागले, दिनेश माणिक बागले आणि सोनू माणिक बागले (सर्व रा. अक्कलपाडा, ता. साक्री) यांच्याविरुद्ध संशयावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.