शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
2
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
3
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
4
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
5
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
6
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
7
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
8
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
9
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
10
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
11
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
12
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
13
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
14
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
15
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
16
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
17
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
18
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
19
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
20
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध

पिक कर्जाच्या विवंचनेत अंचाळेतांडा येथे शेतकºयाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 21:23 IST

गावात व्यक्त झाली हळहळ, परिवाराची वाताहत

धुळे : परतीच्या पावसात अतिवृष्टी झाल्याने शेतातील पिकांचे नुकसान झाले़ त्यात बँकेच्या कर्जामुळे हवालदिल झालेल्या शेतकºयाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली़ ही घटना धुळे तालुक्यातील अंचाळेतांडा गावात घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे़ धुळे तालुक्यातील अंचाळेतांडा येथील नाना बाळू जाधव (४५) या शेतकºयाचे गावशिवारात शेत आहे़ या जमिनीवरच तो पत्नीसह चार मुलांचे पालनपोषण करतो़ त्याने त्याच्या शेतात यंदा कपाशी आणि बाजरीचे पीक घेतले आहे़ परतीच्या पावसात अतिवृष्टी झाल्याने शेतात पाणी साचले आहे़ परिणामी कपाशी आणि बाजरीचे नुकसान झाले आहे़ आताच्या परिस्थितीत पावसाने उघडीप दिली असलीतरी शेतात पाणी साचलेले असल्याने पीक काळे पडून कपाशीच्या बोंडाला कीड लागली आहे़ बाजरीच्या कणसांनाही कोंब फुटले असल्याने हे पीक हातचे गेलेले आहे़ नाना जाधव यांनी सेंट्रल बँकेचे पीक कर्ज आणि फायनान्स    कंपनीकडूनही कर्ज घेतलेले आहे़ हजारो रुपयांचे कर्ज डोक्यावर असताना आता हाती येणारे पीकही गेल्याने गेल्या चार दिवसांपासून नाना जाधव अस्वस्थ होते़ त्यांनी घरात जणूकाही अबोला धरला होता़ दररोज सकाळी शेतात जावून दिवसभर   पिकांकडे पाहत बसणे आणि रात्री घरी येऊन मुकाट्याने झोपणे असा त्यांचा दिनक्रम सुरु झाला होता़ काल सुध्दा ते याच पध्दतीने वागले असल्याचे सांगण्यात येत आहे़ पिकच हाती येणार नसल्याने कर्ज कसे फेडणार? आपले घर कसे धकवणार? असे काहीसे बडबड करीत ते झोपी गेले़ सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी जागी झाली असता पहिल्या रुममध्ये सºयाला दोर बांधून त्याचा गळफास लावून घेत लटकलेल्या स्थितीत नाना जाधव आढळून आले़ त्यांना पाहून त्यांच्या पत्नीने हंबरडा फोडला़ आवाज ऐकून आजुबाजुचे परिसरातील नागरिक धावून आले़ नाना यांना फासावरुन खाली उतरवून रुग्णालयात दाखल करण्यात आले़ डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषीत केले़ मयत नाना जाधव यांचा पुतण्या नरेंद्र अशोक जाधव यांनी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़ सहायक पोलीस उपनिरीक्षक वाघ घटनेचा तपास करीत आहेत़ संपुर्ण परिवार आला उघड्यावरनाना जाधव यांच्या पश्चात पत्नी, पदवीचे शिक्षण घेत असलेली एक मुलगी, एफवायला असलेला एक मुलगा, बारावीचे शिक्षण घेत असलेली मुलगी आणि नववीत शिक्षण घेत असलेला मुलगा असे पाच जणांचे कुटूंब आहे़ घरातील कर्ता पुरुष गेल्याने जाधव कुटुंबिय उघड्यावर आले आहे़ या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे़

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी