मोहिदे येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 22:45 IST2020-05-18T22:45:13+5:302020-05-18T22:45:50+5:30
बिबट्याचा शोध सुरु

मोहिदे येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार
नंदुरबार: तळोदा तालुक्यातील कळमसरे- मोहिदे येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याची घटना रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. शरद खंडू चव्हाण (५२) असे मयत युवकाचे नाव आहे.
मयत शरद हे दुपारी शेतात गेले होते. रात्री ८ वाजता लहान ट्रॅक्टर घेऊन घराकडे येत असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. मान आणि छातीवर बिबट्याने चावा घेतल्याने त्यांचा मृत्यू झाला. वडील घरी न परतल्याने त्यांचा मुलगा शोध घेण्यासाठी गेले असता शेतकरी चव्हाण रक्तबंबाळ अवस्थेत मिळुन आले. त्यांना तातडीने तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वनविभागाला याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने मोहिदे गाव गाठून बिबट्याचा शोध सुरु केला. दरम्यान उपचार सुरु असताना शरद चव्हाण यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.