-पीक पाहणी ॲप हँग होत असल्याने शेतकरी हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:43 IST2021-09-08T04:43:31+5:302021-09-08T04:43:31+5:30
शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर शेतकऱ्यांनीच आपल्या अँड्राईड मोबाईवलर ॲप डाऊनलोड करून ई पीक पाहणी करून आपल्या शेतातील पीकपेऱ्याची माहिती भरायची ...

-पीक पाहणी ॲप हँग होत असल्याने शेतकरी हैराण
शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर शेतकऱ्यांनीच आपल्या अँड्राईड मोबाईवलर ॲप डाऊनलोड करून ई पीक पाहणी करून आपल्या शेतातील पीकपेऱ्याची माहिती भरायची आहे. त्याचे गावागावांत शेतकऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. सुरुवातीला हे ॲप बऱ्यापैकी चालू होते. परंतु आता ॲप डाऊनलोड करून त्यावर माहिती भरण्यासाठी शेतकरी वापर करत असल्याने हे ॲप हँग होत आहे. त्यामुळे अनेकवेळा माहिती भरून शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करावी लागत आहे. त्यात अनेक शेतकऱ्यांना ॲन्ड्राईड मोबाइल कळत नसल्याने कोणालातरी सोबत घेऊन ही पीकपाहणी करावी लागत आहे.
शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्या..........
ई-पीक पाहणीत अनेक अडचणी येत असल्याने यात शेतकरी वंचित राहू नये म्हणून ते तलाठ्यांकडे तक्रारी करत आहे परंतु यात ॲप हँग होत असल्याने तलाठीही काहीही करू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. त्यावर काहीतरी तोडगा काढावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
प्रतिक्रीया
ई पीक ॲप वापरताना शेतकऱ्यांना खूपच अडचणी येत आहे तरी शासनाने काही हंगाम अजून तलाठ्यांनी ऑफलाईन नोंद करून घ्यावे तो पर्यंत शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या मुलांना ते तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी वेळ मिळेल. नेट प्राॅब्लेम, फोटो घेणे, क्षेत्रफळ नोंद करणे अशा अडचणी आहेत
दुसरीकडे पीक पेरा नोंदविल्यावर मदत मिळणार नाही, असे सांगितले जात आहे अशावेळी प्रशासनाने मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा शेतकरी सतीश बोढरे यांनी व्यक्त केले आहे.