मालाची स्वत:विक्री करून शेतकरी आत्मनिर्भर झाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 15:00 IST2020-06-24T15:00:42+5:302020-06-24T15:00:56+5:30
शिंदखेडा : तीन महिन्याच्या कालावधीत झाली तब्बल ६४ कोटी रूपयांची उलाढाल, कृषी विभागाचे मिळाली मदत

dhule
शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल भाजीपाला,सिमला मिरची, काकडी, ढेमसे, शेवगा, टमाटे,मेथी, मुळा, बिट,मिरची, पपई, कलिंगड,पेरू, डांगर,आदी शेतमाल शेजारच्या राज्यातील इंदूर, सुरत, व मुबंई येथिल बाजारपेठेत विक्रीस नेला. मात्र कोरोनामुळे जिल्हा व राज्याच्या सीमा बंदीमुळे त्यांना त्यांचा शेतीमाल विक्री करता आला नाही. सुरवातीस शेतकऱ्यांनी हा शेतीमाल तालुक्यात व शहरात अल्प दारात वाटप केला. उर्वरित गुरांना चारा म्हणून खाऊ घातला. शेतकºयांना मार्केटिंगचे ज्ञान नसल्याने व्यथित झाला. अशा शेतकºयांसाठी तालुका कृषि अधिकारी विनय बोरसे, पंचायत समितीचे कृषी विभाग हे शेतकºयांच्या मदतीस धावून आले. त्यांनी शेतकºयांना मार्गदर्शन करून आपला माल आपणच विकावा यासाठी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त धुळे यांच्या परवानगीने धुळे येथे जीटीपी कॉलनीत विक्री सुरू केली. दुपारच्यावेळी शहरात फिरस्तीने त्याच बरोबर शिंदखेडा, दोंडाईचा, नरडाणे, बेटावदसह ग्रामीण भागातही या ठिकाणीही शेतमाल विक्रीला सुरवात केली. त्यात अनेक शेतकºयांनी आपला शेतमाल विक्री करून आडत हमाली दलाली वाचवून तालुक्यातील शेतकºयांनी स्वत:च शेतमालास बाजारभाव ग्रेडिंग ठरवून पॅकिंंग करून विक्री केले. शहरातील ग्राहकांशी थेट संपर्क आल्याने त्यांनाच गहू,दादर, उन्हाळी बाजरी स्वत: चागल्या भावात विक्री केली. यात कमखेडा येथील शेतकरी राजेंद्र पवार, शामकांत पवार यांनी दादर े विक्री केली. अजंदे ,होळ येथील मनसाराम परदेशी,रतीलाल पाटील, पी. एम. सोनवणे, यांनी गहू विक्री केली. लॉकडाऊनच्या काळात एकट्या बाजरी पिकाची उलाढाल ही सुमारे आठ कोटी रूपये, तर गहू पिकाच उत्पन्न 20हजार टन त्यात उलाढाल ४० कोटी रूपये, ,रब्बी ज्वारी(दादर) उत्पन्न ६ हजार टन,त्यात उलाढाल १५ कोटी रुपये, भाजीपाला, फळ पिकातून सुमारे एक कोटी असे ऐकून ६४ कोटी रुपये झाली.होळ येथील शेतकरि योगेश पाटील, सारवे येथील प्रदीप पाटील,आडगडे, विकवेल प्रदीप पाटील, मेथी महेंद्रसिंग गिरासे, प्रभाकर पाटील अंजनविहिरे, यशवंत महाजन बेटावद, या शेतकºयांनी भाजीपाला, मिरची, काकडी, ढेमसे, बिट, टमाटे, पपई, कलिंगड, पेरू यांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न काढून स्वत: विक्री केले. वरूळ-घुसरे येथील गिरासे यांनी ही डांगर व टरबुज याचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले व स्वत: विक्री केली.
याच काळात खरीपाचा कापूस विक्री अभावी ४० ते ५० टक्के पडून होता. त्यात बाजारसमितीच्या माध्यमातून सी सी आय ो सुमारे तीन लाख क्विंटल १६१ कोटी रूपयांचा कापूस खरेदी केला. तो राज्यात अव्वल ठरला आहे.