शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

धुळयाचे आमदार अनिल गोटेंचा खोटेपणा उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 1:02 PM

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरेंची टिका

ठळक मुद्दे- शहीद जवान योगेश भदाणेंच्या कुटूंबियांना 98 लाखांची मदत- विकृत लोकप्रतिनिधी हे शहराचे दुर्देव- आर्मी व जवानांचा आमदारांकडून अपमान

धुळे- शहीद जवान योगेश भदाणे यांच्या कुटूंबियांना दिलेल्या आश्वासनानुसार त्यांना 98 लाख 88 हजार रूपयांची मदत मिळवून दिली असून त्यामुळे आमदार अनिल गोटे यांचा खोटेपणा पुन्हा उघड झाला आहे, अशी टिका केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. मात्र त्यांनी आमदारांचा थेट नामोल्लेख करणे टाळले. आमदार अनिल गोटे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रक काढून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरे यांच्यावर शहीद जवान योगेश भदाणे याच्या कुटूंबियांना आर्थिक मदतीचे खोटे आश्वासन दिल्याचा आरोप केला होता. हा आरोप खोडून काढत डाॅ. भामरे यांनी आमदारांवर नाव न घेता टिका केली. शहीद जवान योगेश भदाणे यांच्या कुटूंबियांना देण्यात आलेल्या 98 लाख 88 हजार रूपयांच्या आर्थिक मदतीचा सविस्तर तपशिलही डाॅ. सुभाष भामरे यांनी जाहीर केला. त्याचप्रमाणे शहीद जवान योगेश भदाणे यांचे पार्थिव खलाणे गावात हेलिकाॅप्टरने आणण्यात आले होते पण डाॅ. सुभाष भामरे यांच्या व्देषाने आंधळे झालेल्यांना ते दिसले नाही, आमदारांनी आपल्यावरच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, आर्मी व जवानांवर टिका करून त्यांचा अवमान केला आहे अशी टिकाही डाॅ. भामरे यांनी आमदारांवर केली. विकृत लोकप्रतिनिधी हेच शहराचे दुर्देव आहे. खोटे व घाणेरडे आरोप करायचे, धमक्या द्यायच्या, लक्ष विचलित करायचे हेच संबंधित लोकप्रतिनिधीचे काम असल्याचे डाॅ. भामरे म्हणाले.  

टॅग्स :Dr. subhash bhamareडॉ. सुभाष भामरेAnil Goteअनिल गोटे