शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
3
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
4
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
5
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
6
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
7
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
8
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
9
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
10
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
11
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
12
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
13
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
14
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
15
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
16
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
17
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
19
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
20
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती

मिळकत हडपण्यासाठी वक्फ बोर्डाच्या नावाचे बनावट दस्ताऐवज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 22:11 IST

दोघांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल

धुळे : जीवंत व्यक्तीला मयत दाखवून ट्रस्टची मिळकत हडप करण्यासाठी वक्फ बोर्डाच्या नावाने बनावट दस्ताऐवज तयार करुन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन जणांवर आझादनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. फसवणुकीचा हा प्रकार ६ एप्रिल २०१४ पासून आजपावेतो सुरु होता.मोलवीवाडा मशिद ट्रस्टी नियाज अहमदयार मोहम्मद मौलवी (७५, रा. अकबर चौक, मौलवीवाडा, धुळे) यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, एकबाल अहमदयाद मोहम्मद रज्जाक (रा. कसाबवाडा मशिदजवळ, धुळे) आणि रईस शाह साबीर शाह या दोघांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी नियाज अहमदयाद मोहम्मद मौलवी हे जीवंत असून देखील त्यांना मयत दाखविले. ट्रस्टीची मिळकत हडप करण्याच्या उद्देशाने दोघांनी कट कारस्थान रचून खोटे प्रतिज्ञापत्र सादर करुन स्वत:ला ट्रस्टचा अध्यक्ष म्हणून वक्फ बोर्डाच्या नावाचे बनावट दस्ताऐवज तयार करुन फसवणूक केली. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच आझादनगर पोलीस ठाण्यात मोलवीवाडा मशिद ट्रस्टी नियाज अहमदयार मोहम्मद मौलवी यांनी १ जानेवारी रोजी सायंकाळी पावणे पाच वाजता फिर्याद दाखल केली. त्यानुसार, भादंवि कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ४७२, १२० (ब), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक बी. आर. पाटील घटनेचा तपास करीत आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे