बभळाज परिसरात वादळाने पिकांचे प्रचंड नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 12:36 IST2020-03-19T12:35:39+5:302020-03-19T12:36:04+5:30
पंचनामे करुन पिक विमा द्यावा : बागायतदार संघटनेची तहसीलदारांना निवेदन देवून मागणी

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
बभळाज : मंगळवारी सायंकाळी निसर्गाने घेतलेल्या रौद्ररुपाने सर्वांचीच फजिती झाली. मात्र शेतकऱ्यांचे अपरिमीत नुकसान झाले आहे. केळी बागा अक्षरश: उद्ध्वस्त झाल्या असून गहू, मका, ज्वारी, बाजरी, टोमॅटो ही पिकेही जमीनदोस्त झाली आहेत.
मंगळवारच्या सायंकाळी सुमारे साडेपाच वाजेच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होवून आकाशात काळेढग जमू लागले. तेवढ्यात अर्थे, विखरण, शिरपूरला पाऊस सुरू झाला. बभळाज व परिसरातही तुरळक पाऊस सुरु झाल्याचे समजले. अवघ्या काही सेकंदात निसर्गाने रौद्ररुप घेतले. सोसायट्याचा वारा, प्रचंड वेगाचा पाऊस आणि गारा यांनी थैमान घातले. यामुळे अनेकांचे संपूर्ण तर काहींचे थोड्याप्रमाणात नुकसान झाले. केळी बागा कापणीवर असणाºया, नवीन निसवड झालेल्या, कापणी सुरू असलेल्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
तर मका, गहू, ज्वारी, बाजरी, टोमॅटो ही सर्व पिके आडवी झाली आहेत.
या सर्व परिस्थितीचा महसूल यंत्रणा, कृषी विभाग व पिक विमा कंपन्या यांनी त्वरित पंचनामा करावा व शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.
शेतकºयांना नुकसान भरपाई मिळेल यासाठी गांभीर्याने मेहनत घ्यावी, योग्य मार्गदर्शन करावे, अशी मागणी उत्पादक बागायतदार संघटना बभळाज यांनी तहसीलदार शिरपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर मंगलदास गंभीर पाटील, महेंद्र भागवत पाटील, चंद्रकांत भालेराव पाटील, सतिष नामदेव पाटील, अविनाश मगन पाटील, राजेश केशव पाटील, जयपाल उदेसिंग राजपूत व इतर ४४ शेतकºयांच्या सह्या आहेत.
दरम्यान यावर्षी रब्बीचे उत्पन्न चांगले होते. मात्र अवकाळी पावसाने त्यावर पाणी फिरविले आहे.