लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महिला बचत गटातील कर्जदार महिलांकडे संबंधित कंपनीने वसुलीचा तगादा लावल्याची तक्रार सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली़महिला बचत गटाच्या सभासद कामिनी गवळी, माया बारकु घुगरे, मंदा गवळी, जया भवरसिंग चव्हाण, मुक्ताबाई गवळी, शोभाबाई पवार, भिकुबाई पवार, लिलाबाई गवळी, पूनम गवळी आदी महिलांनी सोमवारी जिल्हाधिकाºयांना निवेदन देवून कर्जाची परतफेड करण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी केली आहे़ लॉकडाउनमुळे रोजगार बंद असल्याने आम्ही कर्जाचे हप्ते दवू शकत नाही़ याबाबत पतपुरवठा करणाºया कंपनीला विनंती केली असता कंपनीने धुडकावून लावली़ त्यामुळे महिलांनी प्रशासनाकडे धाव घेतली़
बचत गट कर्जाला मुदतवाढ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 21:13 IST