अटल टिकरिंग लॅबमधील साहित्यातून प्रयोग सादरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 12:51 IST2020-03-01T12:51:01+5:302020-03-01T12:51:31+5:30
म्हसदी । गंगामाता कन्या विद्यालयात शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थिनींनी साकारले विविध उपकरण

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसदी : साक्री तालुक्यातील म्हसदी येथे गंगामाता कन्या विद्यालयात अटल टिकरिंग लॅबमधील साहित्याचा वापर करून शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका व्ही.एन. देवरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आर.एस. पाटील, सी.व्ही. नांद्रे उपस्थित होते.
शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थिनींनी अटल टिकरिंग लॅबमधील साहित्याचा वापर करून विविध प्रयोग सादर केले. त्यात इलेक्ट्रिक कार, पालेभाज्या कटर, शोल्डिंग गन, हैड्रोलिक क्रेन, सौरऊर्जा, पवन उर्जा, विद्युत उर्जा, जनरेटर, प्रदूषणावर आधारीत, टाकाऊपासुन टिकाऊ प्रयोग त्यात टेबल लॅम्प, हवेच्या दाबावर आधारित विविध प्रयोग सादर केले. प्रदर्शनात इयत्ता पाचवी ते सातवी लहान गट, इयत्ता आठवी ते नववी मोठा गट तयार करण्यात आला होता. विद्यार्थिनींनी सुमारे १०० प्रयोगांचे सादरीकरण केले. त्यात लहान गटातून दिपाली रतीलाल ठाकरे प्रथम, उर्वशी जगदीश नेरे द्वितीय तर मोठ्या गटातून प्राची सतीश पाटील, यशश्री दिलीप पाटील, रविना जयप्रकाश भामरे यांनी प्रथम क्रमांक, तर महेक कमर पिंजारी हिने द्वितीय क्रमांक पटकाविला.
तसेच विज्ञान संकलन वही तयार करण्याच्या स्पर्धेत लहान गटातून अंजली भाऊसाहेब पाटील हिने प्रथम तर अनुष्का दिपक चिंचोरे हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. मोठ्या गटात नंदिनी गणेश अहिरे प्रथम क्रमांक, कल्याणी गणेश अहिरे हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी देसले हिने केले. आभार हर्षिता देवरे हिने मानले. कार्यक्रमासाठी के.एस. चव्हाण, एम.डी. साळुंके, एस.बी. गावीत, एस.के. शिरसाठ, विजय अहिरे, वसंत देवरे, कमर पिंजारी, राहुल बागुल आदींनी परीश्रम घेतले.