पाणीटंचाईवर होणाऱ्या खर्चाची केली बचत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:25 IST2021-06-05T04:25:59+5:302021-06-05T04:25:59+5:30
शहरातील सिद्धार्थनगर, रमाईनगर, डाभरी घरकूल, सद्गुरू सोसायटी, बंबनगर आदी नवीन वसाहतींना नवीन जलवाहिन्या टाकून पाणीपुरवठा करण्यात आला. मागील ...

पाणीटंचाईवर होणाऱ्या खर्चाची केली बचत
शहरातील सिद्धार्थनगर, रमाईनगर, डाभरी घरकूल, सद्गुरू सोसायटी, बंबनगर आदी नवीन वसाहतींना नवीन जलवाहिन्या टाकून पाणीपुरवठा करण्यात आला. मागील वर्षी भर उन्हाळ्यात दुरुस्ती केलेली जुनी व अडगळीत पडलेल्या जलवाहिनीमुळे शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. याचे श्रेय
आ. जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा नयनकुंवर रावल आणि पाणीपुरवठा सभापती वैशाली महाजन यांच्या नियोजनामुळे शक्य झाल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण महाजन यांनी दिली.
दोंडाईचा शहरातील नागरिकांना पावसाळ्यात देखील नियमित व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना सूचना करण्यात आली आहे. लवकरच नवीन अद्ययावत जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम पूर्णत्वास येणार आहे.
नागरिकांना नवीन एम.डी.पी.ई. कनेक्शन देण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे.