शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 23:14 IST

धुळे : शहरी व ग्रामीण गटातून उत्स्फूर्त सहभाग, मान्यवरांच्याहस्ते पारितोषिक देऊन विजेत्यांचा गौरव

धुळे : तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा १३ रोजी समारोप करण्यात आला. यावेळी विजेत्यांचा मान्यवरांच्याहस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.तालुक्यातील गोंदूर येथील ओंकार बहुउद्देशीय विकास संस्था संचलित प्रा.रवींद्र निकम ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन्सच्या प्रांगणात ११ ते १३ डिसेंबर दरम्यान तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनात तालुक्यातील विविध शाळांतून शहरी व ग्रामीण गटातून ३०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग होता.विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीने अनेक नवनवीन उपकरण सादर केली. परीक्षकांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार उत्कृष्ट उपकरणांची पुढील प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली.तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १३ रोजी दुपारी ३ वाजता मान्यवरांच्याहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.याप्रसंगी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक संस्थेच्या प्राचार्या डॉ.विद्या पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तर समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शुभांगी निकम होत्या. व्यासपीठावर ओंकार बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष प्रा.रवींद्र ओंकार निकम, संस्थेचे सदस्य रोहित निकम, शिक्षणाधिकारी (निरंतर) जि.प. धुळे) किरण कुवर, गटशिक्षणाधिकारी पुष्पराज शिंदे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विजय बोरसे, सचिव के.बी. नांद्रे, अध्यक्ष पी.झेड. कुवर, संजय पवार, सी.टी. पाटील, जे.बी. सोनवणे, बी.एम. अहिरे, सुनील पाटील, विनोद रोकडे, प्रा.भागवत पाटील, आर.के राजपूत, एस.ए. जाधव, प्राचार्य प्रकल्प पाटील, प्राचार्य डॉ.राजेश अहिरराव, प्राचार्य सागर जाधव, प्राचार्य चेतन पवार आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन प्रा.शुभम ठाकरे यांनी केले. आभार प्रा.नमिता जाधव यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :Dhuleधुळे