लॉकडाऊन काळातील विज बिल माफ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 21:40 IST2020-06-17T21:39:57+5:302020-06-17T21:40:17+5:30

विविध संघटनांची मागणी : आयकर लागू नसलेल्या कुटूंबांना दरमहा साडेसात हजार रुपये द्या

Excuse the electricity bill during the lockdown period | लॉकडाऊन काळातील विज बिल माफ करा

dhule

धुळे : लॉकडाऊन कालावधीमध्ये रोजगार बंद असल्याने सर्वसामान्य गरिब, गरजू कुटूंबांचे विज बिल माफ करावे अशी मागणी विविध संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांसह महावितरण कंपनीकडे केली आहे़
भारतीय कम्युनीस्ट पक्षाने मंगळवारी महावितरणचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन दिले़ देशात आणि राज्यात अडीच महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे रोजगाराचे अर्थचक्र थांबले आहे़ यामुळे कामगार, कष्टकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे़ त्यामुळे महावितरण कंपनीने या कालावधीतील विज बिलात खास बाब म्हणून सुट द्यावी अशी मागणी भाकपचे सेक्रेटरी कॉ़ पोपटराव चौधरी, कॉ़ हिरालाल सापे, कॉ़ मदन परदेशी, कॉ़ रमेश पारोळेकर, कॉ़ वसंत पाटील, कॉ़ अशोक बाविस्कर, कॉ़ हिरालाल परदेशी, कॉ़ अशोक बाविस्कर आदींनी केली आहे़ विज बिल माफ केले नाही तर जनआंदोलन उभारण्याचा इशारा भाकपने दिला आहे़
दरम्यान, भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीच्या धुळे जिल्हा शाखेने जिल्हाधिकाºयांमार्फत देशाच्या प्रधानमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे़ आयकर लागू नसलेल्या सर्व कुटूंबांना सहा महिने दरमहा साडेसात हजार रुपये रोख द्यावे, सहा महिन्याचे दरडोई दहा किलो धान्य मोफत द्यावे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वाढीव मजुरी देवून किमान दोनशे दिवस रोजगार उपलब्ध करुन द्यावा, शहरी भागातील गरिबांसाठी देखील ही योजना लागू करावी, बेरोजगारांना त्वरीत भत्ता जाहीर करावा, राष्ट्रीय संपत्तीची लूट आणि सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण थांबवावे, कामगार कायदे रद्द करण्याचे धोरण मागे घ्यावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत़ या मागण्यांची दखल न घेतल्यास तिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा कॉ़ पोपटराव चौधरी, कॉ़ एल़ आऱ राव, कॉ़ दिपक सोनवणे, कॉ़ राजेंद्र चौरे, कॉ़ डबीर शेख, कॉ़ अविनाश चित्ते आदींनी दिला आहे़
दरम्यान, विज बिल माफीच्या मागणीसाठी युवा मल्हार सेनेने बुधवारी महावितरण कंपनीच्या कार्यालयात निदर्शने केली़ अधीक्षक अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे उद्योग व्यवसाय ठप्प झाल्याने रोजगार बंद पडला होता़ कामगार, कष्टकरी कुटूंबे गेल्या अडीच महिन्यांपासून घरीच बसले आहेत़ रोजगार हिरावला गेला आहे़ अशा परिस्थितीत विज बिल माफ करावे़ महावितरण कंपनीकडून गेल्या अनेक वर्षांपासून विज मूल्याची दुप्पट दराने आकारणी होत आहे़ सध्याच्या संकटकाळात अनेकांची कमाई कमी झाली आहे तर काहींची बंद आहे़ त्यामुळे एप्रिल २०२० पासून पुढील सहा महिन्यांचे तीनशे युनीटपर्यंत ग्राहकांना सरसकट पन्नास टक्के सवलत द्यावी, अशी मागणी धनगर समाज युवा मल्हार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विनोद खेमनार, दिपक चोरमले, शिरीष धनगर, जिल्हाध्यक्ष भारत शिंदे, युवक जिल्हाध्यक्ष अनिल खेमनार, प्रकाश मनोरे, नामदेव चोपडे, मांगिलाल सरग, चंद्रकलाबाई मासुळे, जिल्हाध्यक्षा अलका मासुळे, भालचंद्र धनगर, योगेश हटकर, प्रकाश खरात, सुनील मारनोर, अल्पेश पारखे आदींनी केली़
लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यानंतर महावितरण कंपनीने घरोघरी जावून रिडींग घेणे सुरू केले आहे़ तसेच विज बिले देखील दिली जात आहेत़ लॉकडाऊन काळातील एकत्रीत रिडींग घेवून बिले दिली जाणार आहेत़ शिवाय या एकत्रि बिलासाठी सोयीचे हप्ते ठरवून दिले जातील, असे महावितरण कंपनीने कळविले आहे़

Web Title: Excuse the electricity bill during the lockdown period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे