सम विषम तत्वातून किराणा दुकाने वगळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 23:15 IST2020-06-10T23:15:30+5:302020-06-10T23:15:54+5:30

मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Exclude grocery stores from the even odd principle | सम विषम तत्वातून किराणा दुकाने वगळा

dhule

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : सम विषम वेळापत्रकातून किराणा दुकानांना वगळून दररोज दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी असोसिएशन आॅफ बिझनेस अ‍ॅण्ड कॉमर्सने केली आहे़ यासंदर्भात असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष कोटेचा, उपाध्यक्ष गोकूळ बधान, सचिव किशोर अग्रवाल, खजिनदार सुधाकर पाचपुते, अजय बरडीया आदींनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून निवेदन दिले़ किरणा दुकाने विखुरलेली आहेत़ सम विषम वेळापत्रकामुळे एका भागातील दुकाने बंद असल्याने दुसºया भागातील दुकानात गर्दी होते़ त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता आहे़
जीवनावश्यक वस्तुंसाठी सर्व किराणा दुकाने दररोज सुरू ठेवली तर गर्दी होणार नाही असे सूचविले़

Web Title: Exclude grocery stores from the even odd principle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे