नेर परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:41 IST2021-08-17T04:41:20+5:302021-08-17T04:41:20+5:30
प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच गायत्रीदेवी जयस्वाल, केंद्रप्रमुख निर्मला कदम, सेवानिवृत्त सुभेदार मेजर अनिल सूर्यवंशी, नायक सुभेदार छोटू गुरव, सेवानिवृत्त ...

नेर परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात
प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच गायत्रीदेवी जयस्वाल, केंद्रप्रमुख निर्मला कदम, सेवानिवृत्त सुभेदार मेजर अनिल सूर्यवंशी, नायक सुभेदार छोटू गुरव, सेवानिवृत्त सैनिक हवालदार ज्ञानेश्वर वाडीले, युवराज कोळी, विकास वाघ, ग्रामपंचायत सदस्य सुमित जयस्वाल तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.
योगेश्वरी गवळे हिने भाषण केले. या कार्यक्रमास ग्रा. पं. सदस्य राजधर अमृतसागर, जीवन मोरे, जाकीर तांबोळी, पंढरीनाथ शंखपाळ, जगन्नाथ सोनवणे, बदरुद्दीन खाटीक, गिरीश पगारे, सदाशिव सोनवणे, झिपा सोनवणे, सुभाष परदेशी, बाळू सोनवणे, सुनील चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक संजय थोरात, पुरुषोत्तम शिंदे, तबसुम, रामभाऊ पाटील, बिपीन अमृतसागर, योगेश कोळी, संगीता वाघ, संगीता देवरे, प्रतिभा बोरसे, स्वाती पगारे, निर्मला गढरी, मधुकर सोनवणे, संगीता मिस्तरी, सीमा कोळी यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन रामभाऊ पाटील यांनी केले. आभार योगेश कोळी यांनी मानले.
कन्या हायस्कूल
नेर येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक संस्थेच्या धनाबाई कौतिक खलाणे कन्या हायस्कूल व येडीबाई काशीराम माळी कन्या कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
माजी सरपंच शंकरराव हिरामण खलाणे यांच्या वतीने प्राचार्य प्रवीण लोटन खलाणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २०२० मध्ये दहावीत प्रथम आलेली विद्यार्थिनी जान्हवी किशोर वाघ व इयत्ता १२ वीत प्रथम आलेली विद्यार्थिनी मुस्कान रशीद शेख तसेच सन २०२१ मधील इयत्ता १०वीत प्रथम आलेला विद्यार्थी कमलेश आनंदराव मराठे व इयत्ता १२वीत प्रथम आलेली विद्यार्थिनी लक्ष्मी गोरख गवळे या सर्वांना प्रत्येकी ट्रॉफी व ५०१ रुपयांचे बक्षीस देण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष भटू दगा खलाणे तसेच संचालक पोपटराव लोटन बाविस्कर, शंकरराव हिरामण खलाणे, बन्सीलाल तुळशीराम खलाणे, शाळेचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक आर. एच. माळी, शेख रुबा शेख सुपडू, शाळेचे मुख्याध्यापक बन्सीलाल दौलत खलाणे, पर्यवेक्षक व्ही. के. जोशी उपस्थित होते.
तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस दूरक्षेत्र, न्यू इंग्लिश स्कूल आदी ठिकाणी कार्यक्रम झाले.
ग्रामपंचायत आवारात कार्यक्रम
नेर ग्रामपंचायतीच्या वतीने सकाळी ग्रामपंचायत आवारात ध्वजारोहण सेवानिवृत्त सुभेदार मेजर अनील सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रथम डॉ. रोहिदास तानकू बोरसे व डॉ. शुभांगी रोहिदास बोरसे यांच्या हस्ते ध्वजपूजन झाले. सेवानिवृत्त सुभेदार मेजर अनिल सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सलामी देण्यात आली. यावेळी माजी सैनिक सुकलाल बिलाडे, डॉ. मोहन बोढरे, विकास वाघ, ज्ञानेश्वर वाडीले, सरपंच गायत्रीदेवी जयस्वाल, उपसरपंच लीलाबाई सोनवणे, ग्रामविस्तार अधिकारी उमाकांत बोरसे, कोतवाल नाना कोळी, ग्रामपंचायत सदस्य दीपक मोरे, जिजाबाई मालचे, निर्मला खलाणे, सुनील भागवत, शोभा कोळी, शीतल बोढरे, लक्ष्मीकांत बोढरे, सुमित जयस्वाल, कल्पना जगदाळे, जाकीर तांबोळी, कलाबाई चव्हाण, राजधर अमृतसागर, जीवन मोरे, फुलाबाई पिंपळसे, गावातील ज्येष्ठ नागरिक प्रकाशराव देशमुख, साहेबराव सोनवणे, हिंमत बोरसे, आनंद पाटील, मांगू मोरे, डाॅ. मोहन बोढरे, संजय सैंदाणे, राजाराम बोढरे, बाळू सोनवणे, आर. डी. माळी, गुलाब बोरसे, नारायण बोढरे, पंढरीनाथ शंखपाळ, जगन्नाथ सोनवणे, मुकुंद साखरे, वसंत मोरे, आबा वाणी, पंकज वाघ, सुनील चौधरी, जितु कोळी, किरण कोळी, झिपा नाईक, दयाराम माळी, विशाल देशमुख, विश्वास याळीस, देवीदास माळी, निंबा कराड, पोलीस दूरक्षेत्रातील पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, प्रल्हाद चव्हाण, पोलीस नाईक प्रमोद ईशी, पोलीस कॉन्स्टेबल राकेश मोरे, सुमित चव्हाण, ग्रामपंचायत लिपिक संजय वाघ, हर्षल मोरे, राकेश जाधव, शिपाई बापू सोनवणे, वाॅटरमन मांगू मोरे, देवा जाधव, पंकज चौधरी, धनराज माळी, प्रवीण माळी, ईश्वर चव्हाण, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या. सूत्रसंचालन शिक्षक रामभाऊ पाटील यांनी केले. आभार संजय सैंदाणे यांनी मानले.
नेर प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवानिवृत्त सैनिक विकास वाघ व युवराज बोरसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुनील महाले, सरपंच गायत्रीदेवी जयस्वाल, सुमित जयस्वाल, दयाराम चव्हाण, गुलाब बोरसे, दीपक आखाडे, आरोग्य सेवक, सेविका व ग्रामस्थ होते.
भदाणे येथे कार्यक्रम
भदाणे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सीआरपीएफ जवान तुषार पोपट माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यापुढे स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट आणि प्रजासत्ताकदिनी २६ जानेवारीला गावातील प्रत्येक जवानाला हा मान देऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला. कार्यक्रमाला सरपंच बापू मालचे, पोलीसपाटील युवराज पाटील, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम रेवजी माळी, रघुनाथ जिभाऊ, त्र्यंबक पाटील, सुरेश माळचे, प्रभाकर माळी, नाना माळी, जसवंत माळी, अशोक सोनवणे, गुलाब पाटील, श्रीकांत खलाणे, शंकर कोळी, विश्वास पाटील, रावसाहेब पाटील, गावातील तरुण सूरज महानर, भूषण मासुळे, मंगेश मोहिते, अजय पाटील, देवा कोळी, जयेश कोळी, सागर सरक, दिनेश माळी, विजय सोनवणे, मनोज सूर्यवंशी, योगेश सोनार, रविना मासुळे, आबा मोरे आदी तसेच तलाठी, ग्रामसेवक शेवाळे, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.