‘जिल्हा परिषद शाळा वर्गखोलीची दुरवस्था’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित झाले होते. याची शिक्षण विभागाने तत्काळ दखल घेतली. दोंडाईचा विभागाचे विस्तार अधिकारी डी.डी. सोनवणे यांनी तत्काळ संबंधितांना शाळेच्या परिसरात साफसफाई करण्यासाच्या सूचना दिल्या. त्यानंतर, यंत्रणा हलली. त्यानंतर, जेसीबीच्या साह्याने या शाळा परिसरात असलेल्या बाभळीची झाडे काढून टाकण्यात आली. जि.प.शाळेच्या खोलीने मोकळा श्वास घेतल्याने, पालक वर्गामध्ये समाधान व्यक्त होत आहे.
या.....
ती वर्गखोली अतिरिक्त असल्याचे मुख्याध्यापक यांनी सांगितले. मात्र, लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच, वर्गखोलीची स्वच्छता व काटेरी झाडे काढण्याच्या सूचना दिल्यात. त्याप्रमाणे, जेसीबी आणून स्वच्छता करण्यात आली. शाळा परिसर सुशोभित करण्यात येईल.
डी.डी. सोनावणे
विस्तार अधिकारी दोंडाईचा विभाग