धुळे : आदिवासींवर गोळीबार करून त्यांची जमीन हिसकविण्याचा प्रकार उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे घडला. यात नऊ आदिवासींना आपला जीव गमवावा लागला. दरम्यान हे हत्याकांड करणाºया आरोपींना अटक करून, त्याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी मूलनिवासी संघातर्फे जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे केली. जिल्हा प्रशासनामार्फत राष्टÑपतींना निवेदन पाठविण्यात आले. त्यात म्हटले आहे की, पूर्वापार आदिवासींची जमीन असतांना प्रशासनातील काहींनी आर्थिक फायद्यासाठी माजी अधिकारी प्रभात मिश्रा,व नातेवाईकांच्या नावावर जमीन करून आदिवासींना तेथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. आदिवासींवर गोळ्या झाडल्या. त्यात १० जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची सीबीआयद्वारे चौकशी करून आरोपींना अटक करावी, त्यांना कठोर शासन करावे, मृताच्या कुटुंबियांना, जखमींना मदत करावी अशी मागणी केली. निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड यांना निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष मोहन मोरे, गोपीचंद शिरसाठ, अॅड. राहूल वाघ, पी.बी. निकुंभे, नरेंद्र खैरनार, एन. सी.गायकवाड, किशोर अहिरे, रवींद्र पाटील, रोहन मोरे उपस्थित होते.
सोनभद्रच्या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:16 IST