मोबाईलच्या जमान्यातही लँडलाइनची 'ट्रिंग ट्रिंग' वाजतेय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:40 IST2021-09-05T04:40:44+5:302021-09-05T04:40:44+5:30

धुळे - सध्या मोबाईलधारकांची संख्या वाढली आहे. प्रत्येकाजवळ मोबाईल हा असतोच. लँडलाईन फोन दुर्मीळ झाले असले तरी त्यांची ट्रिंग ...

Even in the age of mobile, the landline's 'tring tring' is ringing. | मोबाईलच्या जमान्यातही लँडलाइनची 'ट्रिंग ट्रिंग' वाजतेय..

मोबाईलच्या जमान्यातही लँडलाइनची 'ट्रिंग ट्रिंग' वाजतेय..

धुळे - सध्या मोबाईलधारकांची संख्या वाढली आहे. प्रत्येकाजवळ मोबाईल हा असतोच. लँडलाईन फोन दुर्मीळ झाले असले तरी त्यांची ट्रिंग ट्रिंग अजूनही ऐकू येते आहे.

काही वर्षांपूर्वी लँडलाईन फोनला मोठी मागणी होती. घराघरांत लँडलाईन फोन असायचे. मात्र, मोबाईल आल्यानंतर लँडलाइनची संख्या कमी झाली आहे. शासकीय कार्यालये किंवा खासगी कंपनीच्या कार्यालयात लँडलाइनचा अधिक वापर होतो. अशी परिस्थिती असली तरी बहुतांश घरांमध्ये आजही लँडलाइनला पसंती मिळत आहे. अर्थातच लँडलाईन फोन वापरणाऱ्या नागरिकांची संख्या मोबाईलधारकांच्या तुलनेत अत्यल्प आहे. शासकीय सेवेतून निवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारी लँडलाईन वापरायला पसंती देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. बीएसएनएल या दूरसंचार कंपनीने सेवेत सुधारणा करावी, अधिक तंत्रस्नेही व्हावे अशी अपेक्षा लँडलाईनधारकांनी व्यक्त केली आहे.

क्वाइनबॉक्स झाले दुर्मीळ

जिल्ह्यात क्वाइनबॉक्स नाहीसे झाले आहेत. आता खूप कमी प्रमाणात क्वाइनबॉक्सचा वापर केला जात आहे. पूर्वी ठिकठिकाणी क्वाइनबॉक्स नजरेस पडायचे. आता मोबाईलमुळे क्वाइनबॉक्स वापरकर्त्यांची संख्या रोडावली आहे.

क्वाइनबॉक्स वापरणारे कोण

सध्या क्वाइनबॉक्सची संख्या कमी झाली असली तरी काहीजण आजही क्वाइनबॉक्सचा वापर करतात. शहरातील ठरावीक जनरल स्टोअर्समध्ये आजही क्वाइनबॉक्स दिसतात. ज्यांच्याकडे मोबाईल नाही किंवा मोबाईल वापरता न येणारे नागरिक क्वाइनबॉक्स वापरतात.

केवळ पाच हजार लँडलाईन

जिल्ह्यात सद्य:स्थितीत पाच हजार लँडलाईन आहेत. यापूर्वी २५ ते ३० हजार लँडलाईन फोन वापरले जात असल्याची माहिती मिळाली. मात्र आता लँडलाईनची संख्या कमी झाली आहे. बहुतांश व्यापारी, शासकीय सेवेतून निवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारी तसेच विविध कार्यालयांत लँडलाईन फोन वापरले जातात.

म्हणून लँडलाईन आवश्यकच

मोबाईलपेक्षा लँडलाइनवर आवाज स्पष्ट येत असल्याने लँडलाईन वापरायला पसंती देतो. मोबाईलपेक्षा लँडलाईन वापरायला आवडते. बीएसएनएल कंपनीने अधिक सुविधा देण्याची आवश्यकता आहे.

- पारस पाटील, धुळे.

मोबाईलमुळे निर्माण होणाऱ्या लहरींपासून धोका असल्याची चर्चा नेहमीच होते. त्या तुलनेत लँडलाईन अधिक सुरक्षित आहे म्हणून लँडलाईन फोन वापरतो.

- सुभाष चौधरी, धुळे.

Web Title: Even in the age of mobile, the landline's 'tring tring' is ringing.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.