दोन वर्षानंतरही मिळाले नाही, रेल्वे स्टेशन राेडवरील अतिक्रमणधारकांना हक्कांच घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 22:35 IST2020-11-13T22:34:34+5:302020-11-13T22:35:50+5:30
भाजपाच्या सत्ताधारी नेत्याकडून आश्वासन मिळाल्यानंतर निघाले होते अतिक्रमण

dhule
धुळे : रेल्वे स्स्टेशनरोड लगत असलेले अतिक्रमण जमिनदोस्त केले. यावेळी अतिक्रमण धारकांना पुर्नवसन करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र सुमारे ३१० घरकूलांपैकी केवळ ८० पुर्नवसन झाले आहे. अद्याप २३० अतिक्रमण धारक सत्ताधारी नेत्यांनी दिलेल्या आश्वासनाच्या पूर्तीची प्रतिक्षा करीत आहे.
महापालिकेकडून काही अतिक्रमण धारकांचे मोहाडी व साक्रीरोडवरील काही ठिकानी म्हाडाच्या घरात पुर्नवसन केले आहे. मात्र या घरांमध्ये वीज कनेक्शन व मुलभूत समस्या असल्याने अनेकांनी घरांमध्ये जाण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अन्य नागरिकांना आजही हक्काचे घर नाही. न्याय न मिळाल्यास पुन्हा त्याच ठिकाणी घरे उभारू असाही इशारा अतिक्रमणधारकांनी दिला आहे.
जाहीरनाम्यात आश्वासने
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारून पांझरा नदी स्वच्छ ठेवणार
शहरात भूमिगत वीज वाहिन्यांचे जाळे तयार करणार
धुळे महापालिकेतील सर्व गटारे भूमिगत करणार
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावी राबविणार
शहरातील झोपडपटी परिसरातील दर्जदार पायाभूत सुविधा उभारणार
फायर ब्रिग्रेड सुसज्ज व उद्यापत करणार
अद्यापत भाजीपाला मार्केट साकारणार तसेच वाचकांसाठी ई- लायब्ररी
महिला व पुरूषांसाठी दर्जेदार स्वच्छतागृहे उभारणार
आश्वासनांची सद्यस्थिती
शहरातून निघणारे सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे.
शहरातील दाट लोकसंख्येच्या ठिकाणी विज तारांचा धाेका असतांना भूमिगत वीज वाहिन्या शंभर टक्के भूमिगत दिसून येत नाही.
काही भागात भूमिगत गटारी तोडून नव्याने गटारी तयार केल्या जात आहे. तर काही कॉलनी भागात आजही सांडपाणी रस्त्यावर सोडले जाते.
मिल परिसरातील अतिक्रमण धारकांना सात बारा मिळण्याबाबत दीड वर्षापूर्वी ठराव झाला होतो. मात्र अद्याप नागरिकांना न्याय मिळालेला नाही. शहरातील काही भागात फायर ब्रिग्रेडचे वाहन जावू शकत नाही. त्यासाठी लहान वाहन आवश्यक असतांना मनपाकडून याकडे दुर्लक्ष केले जाते.
पाच कंदील भाजी मार्केटचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. त्यामुळे याठिकाणी सतत वाहतूकीची कोंडी होते.
फेरीवाले व अन्य व्यवसायिकांसाठी बैठक व्यवस्था नसल्याने रस्त्यावर बसून दुकान थाटतात. त्यामुळे मनपाकडून पुर्नवसन होणे गरजेचे आहे.
विद्यार्था्ना ई-लायब्ररी सुरू करण्याचे आश्वासनाची विसर पडली आहे.