ए़टी़पाटील अश्लिल फोटोप्रकरणी गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 13:43 IST2019-04-06T13:43:25+5:302019-04-06T13:43:58+5:30

पश्चिम देवपूर : पीडित महिलेची फिर्याद

Etihad fiasco photo filing offense | ए़टी़पाटील अश्लिल फोटोप्रकरणी गुन्हा

dhule

धुळे : खासदार ए़ टी़ पाटील अश्लिल प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्त विरोधात पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ दरम्यान, हे प्रकरण संपुर्ण राज्यात गाजले होते़ परिणामी पाटील यांना त्याचा मोठा फटका सहन करावा लागला आहे़
गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून संपुर्ण राज्यात गाजलेले खासदार ए़ टी़ पाटील अश्लिल फोटो प्रकरण सध्या वेगळ्याच वळणावर गेलेले आहे़ याप्रकरणी अज्ञाताविरोधात पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात पीडित महिलेने शुक्रवारी फिर्याद नोंदविली आहे़
त्यानुसार, २१ फेब्रुवारी २०१९ रोजी अज्ञात व्यक्तीने मित्र ए़ टी़ पाटील यांचे शारीरिक संबंधाचे अश्लिल फोटो सोशल मिडीयावर प्रसारीत केले़ पीडित महिलेसह त्यांचे मित्र ए़ टी़ पाटील यांची बदनामी केल्याने पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात भादंवि कलम ५०० सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (ई), ६७ (अ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सतिष गोराडे करीत आहेत़
ए़ टी़ पाटील आणि माझ्यात प्रेमाचे संबंध होते़ याची कल्पना माझ्या पतीला माहित होती़ असे त्या पीडित महिलेने दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे़
गेल्या अनेक दिवसांपासून अश्लिल फोटोबाबत उलट-सुलट चर्चा सुरु होती़ आता पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आल्याने चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे़ या घटनेचे पडसाद उमटल्याने पाटील यांना मोठी किंमत मोजावी लागली़ या घटनेचीच चर्चा सुरु होती़

Web Title: Etihad fiasco photo filing offense

टॅग्स :Dhuleधुळे