रोहिणी येथे आदिवासी युवा शाखेची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:41 IST2021-08-13T04:41:09+5:302021-08-13T04:41:09+5:30
शिरपूर : तालुक्यातील रोहिणी गावात जय आदिवासी युवा शक्ती शाखेची स्थापना स्थापना करण्यात आली. जय आदिवासी युवा शक्ती ...

रोहिणी येथे आदिवासी युवा शाखेची स्थापना
शिरपूर : तालुक्यातील रोहिणी गावात जय आदिवासी युवा शक्ती शाखेची स्थापना स्थापना करण्यात आली. जय आदिवासी युवा शक्ती (जयस) सध्या देशभरात एकूण अकरा आदिवासीबहुल राज्यात व्यापक प्रमाणात काम करत आहेत. त्याचाच भाग म्हणून शिरपूर तालुक्यातील रोहिणी गावात जय आदिवासी युवाशक्ती (जयस) शाखेची स्थापना करून फलक अनावरण जिल्हा परिषद सदस्य कैलास पावरा व डॉ. हिरा पावरा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामजिक चळवळीला बळ मिळावे म्हणून युवकांना कार्यभार सोपविण्यात आला.
यावेळी रोहिणी शाखेचे अध्यक्ष म्हणून शोभाराम पावरा, उपाध्यक्ष विनेश पावरा, उपाध्यक्ष विलास पावरा, सचिव रमेश पावरा, सहसचिव अनिल भील, मीडिया प्रभारी विकास पावरा, सहसचिव थावऱ्या पावरा, संघटनमंत्री जगदीश पावरा, कोषाध्यक्ष सुरेश पावरा, मीडिया प्रभारी रोहिदास पावरा, महामंत्री दीपक पावरा, मीडिया प्रभारी, अमिलाल पावरा, राकेश पावरा, रमेश भील, अंकित पावरा यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच नवनिर्वाचित युवकांना नियुक्तिपत्र व जयसचा गमछा देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी जयस उपाध्यक्ष महाराष्ट्र, पंचायत समिती सदस्य बागल्या पावरा, पोलीसपाटील सुभाष पावरा, सरपंच डॉ. आनंदराव पावरा, मुंबई जयसचे दिलीप ठाकरे, जयसचे तालुकाध्यक्ष भूपेश पावरा, उपाध्यक्ष जगदीश पावरा, कार्याध्यक्ष मनोज पावरा, संपर्कप्रमुख शिवाजी पावरा, भोजू पावरा, दिनेश पावरा, वसंत पावरा, खेमा पावरासह तालुका जयस पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जयस शिरपूर तालुका उपाध्यक्ष राजेश पावरा यांनी केले.