एसव्हीकेएममध्ये विद्यार्थी मंत्रीमंडळाची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:35 IST2021-07-29T04:35:30+5:302021-07-29T04:35:30+5:30

यंदाचा सोहळादेखील हा अतिशय निराळ्या पद्धतीने म्हणजेच पालकाकडून पाल्याचा गौरव करून साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना पालकांच्या हस्ते शाळेतर्फे देण्यात ...

Establishment of Student Cabinet in SVKM | एसव्हीकेएममध्ये विद्यार्थी मंत्रीमंडळाची स्थापना

एसव्हीकेएममध्ये विद्यार्थी मंत्रीमंडळाची स्थापना

यंदाचा सोहळादेखील हा अतिशय निराळ्या पद्धतीने म्हणजेच पालकाकडून पाल्याचा गौरव करून साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना पालकांच्या हस्ते शाळेतर्फे देण्यात आलेले सॅश व बॅच देऊन सन्मानित करण्यात आले. पालकांच्या हस्ते पाल्याचा सन्मान होत आहे हे पाहणे खरोखरच एक सुखद अनुभव होता. विद्यार्थी मंत्रीमंडळ सदस्यांची निवड ही इयत्ता १० वी व ११ वीच्या विद्यार्थ्यांचा शाळेतील विविध उपक्रमातील सहभाग, शैक्षणिक प्रगती व त्यांच्यातील नेतृत्व गुण या आधारावर शिक्षकांनी केली.

या समारंभात इयत्ता ११ वीतील हेड बॉय निक्षय शामसुखा, हेड गर्ल रितिका अग्रवाल यांची निवड करण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री वंश अग्रवाल, व्हाइस सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री पूर्वा देशमुख, क्रीडामंत्री पार्थ अग्रवाल, व्हाईस क्रीडामंत्री ध्यान पटेल, असेम्ब्ली मंत्री सेहरा शेख, असेम्ब्ली व्हाइस मंत्री रिया साभद्रा, सफायर हाऊस मंत्री परम कटारिया, व्हाईस हाऊस मंत्री आर्यन श्रॉफ, प्रिफेक्ट अदिती पाटील, मनन भंडारी, रुबी हाऊस मंत्री विनीत अग्रवाल, व्हाइस हाऊस मंत्री कस्तुरी देवरे, प्रिफेक्ट विरम जैन, अद्वय रानडे, टोपाझ हाऊस मंत्री वंश शाह, व्हाइस हाऊस मंत्री जिया भंडारी, प्रिफेक्ट हरीकृष्णन नायर, तनिष्क अग्रवाल, एमरल्ड हाऊस मंत्री ईशा सिंघल, व्हाइस हाऊस मंत्री पार्थ भदाणे, प्रिफेक्ट स्वस्तिका फाफट, दिव्यम जोशी, तसेच संपादकीय मंडळासाठी महक अग्रवाल या विद्यार्थ्याची निवड करण्यात आली. या चारही हाऊसचे विद्यार्थी व सर्व प्रतिनिधी यांनी निष्ठा, सत्यता, सन्मान व या शाळेचे आदर्श उद्दिष्ट उच्च स्तरावर ठेवण्याची शपथ घेतली.

शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा मेनन यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना कर्तव्य पार पाडण्यास नि:पक्षपाती व प्रामाणिकपणा अंगीकारण्याचा मोलाचा सल्ला दिला. तसेच नेतृत्वगुणाचा विकास करून शिस्तबद्ध पद्धतीने वाटचाल करण्याबाबत मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका मेनन यांच्या मार्गदर्शनाखाली सना देशमुख, मनोहर पवार, शाळेतील शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. सूत्रसंचालन सुकन्या घोष यांनी केले.

Web Title: Establishment of Student Cabinet in SVKM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.