स्थलांतरीत मजुरांसाठी हाडाखेड चेक पोस्टवर मदत केंद्र स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 22:15 IST2020-05-15T22:14:27+5:302020-05-15T22:15:08+5:30
धुळे जिल्हा पोलीस : फु्रड पॅकेटस्सह पिण्याचे पाणीही उपलब्ध

स्थलांतरीत मजुरांसाठी हाडाखेड चेक पोस्टवर मदत केंद्र स्थापन
शिरपूर : शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्यावतीने हाडाखेड चेक पोस्ट येथे स्थलांतरीत मजुरांसाठी मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे़ या केंद्राच्या माध्यमातून मजुरांकरीता फु्रड पॅकेटस्, पिण्याचे पाणी तर एसटी बस चालकांनाही चहा बिस्किटे उपलब्ध करुन दिले जात आहे़ धुळे जिल्हा पोलीस दलाचा हा उपक्रम आहे़
मजुरांना आवश्यक असल्यास वैद्यकीय सुविधा देखील याठिकाणी उपलब्ध करुन दिले जात आहे़ हाडाखेड चेक पोस्टच्या मदतीने स्वच्छतागृह, हॅण्डवॉश उपलब्ध करुन दिलेले आहे़ याठिकाणी किमान हजार फूड पॅकेटस् रोज वाटप करण्याचे नियोजन केले आहे़ तसेच मध्यप्रदेश सिमेपर्यंत बससेवा असून पुढील राज्याच्या बसेस येत नाही तो पर्यंत विश्रांती कक्ष देखील सुरु करण्यात आलेला आहे़
त्यामुळे सिमाभागात मजुरांची गर्दी कमी होण्यात मदत होत आहे़ मध्यप्रदेश राज्यातील बस आल्यानंतर पुढील प्रवासासाठी मजुरांना पाठविण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे़
या कामी पोलिसांसह आरटीओ विभाग, सदभाव कंपनीचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, नागरिक यांचे सहकार्य मिळत आहे़