बोरकुंड येथे शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 13:25 IST2019-11-10T13:24:46+5:302019-11-10T13:25:31+5:30
ग्रामीण भागात असेल सर्वाधिक उंच। सरपंच बाळासाहेब भदाणे व मित्रमंडळाचा पुढाकार

dhule
बोरकुंड : छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले तरी तरुणाईपासून आबालवृद्धापर्यंत सर्वांचे रक्त सळसळते अतिशय कठीण काळात अठरा पगड जातींना बाराबलुतेदारांना एकत्र करत जनतेचे सुराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बोरकुंड गावी व्हावा यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून शिवप्रेमींची मागणी होती. मात्र अनेक अडचणी येत होत्या. बोरकुंडचे सरपंच बाळासाहेब भदाणे यांनी पुढाकार घेऊन मराठा मंडळास सोबत घेत शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा येत्या १९ फेब्रुवारी शिवजयंती दिनी अनावरणाचा संकल्प केला आहे. त्याचा भूमिपूजन समारंभ नुकताच बोरकुंड येथे उत्साहात पार पडला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते डॉ.राजेंद्र भदाणे, माजी सभापती नारायण देवरे, प्रकाश पाटील, मांडळचे सरपंच डॉ.संदीप पाटील, रतनपुराचे सरपंच सुनील चौधरी, विंचूरचे सरपंच महेंद्र देसले, होरपाडाचे सरपंच रवींद्र कठाळे, तरवाडेचे सरपंच अनिल पाटील, नंदाळेचे सरपंच योगेश पाटील, दोंदवाडचे सरपंच बापू माळी, चांदेचे सरपंच मधुकर पाटील, नाण्याचे सरपंच अजयसिंग राजपूत, प्रकाश पाटील, दिलीप पाटील, नंदकिशोर पाटील, तुकाराम पाटील, नरेश माळी, राजेंद्र मराठे, डॉ.रवींद्र नानकर, किसन पारिख, प्रकाश बंब, वाल्मीक वाघ, चंद्रशेखर भदाणे, शाम भदाणे, प्रशांत भदाणे, बाबाजी पाटील, संजय भदाणे, बापूजी पाटील, बंडू पवार, देवेंद्र माळी, दीपक घोडके, भरत भदाणे, गंगाधर वाघ, एकनाथ माळी, अरुण वाणी, हंसराज भदाणे, अनिल भदाणे, मोहन पाटील, विनोद भदाणे, विक्रम जाधव, वाल्मीक पाटील, दीपक भदाणे, राजेंद्र जगताप उपस्थित होते.
मराठा मंडळाची आर्थिक मदत
शिवछत्रपतींचा पुतळा साकारण्यासाठी गावातील मराठा मंडळाने पुढाकार घेतला असून पुतळा उभारण्यासाठी पाच लाख रुपयांची मदत करणार असल्याचा ठराव मंडळाच्या बैठकीत करण्यात आला. यावेळी मराठा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दीपक घोडके, उपाध्यक्ष संदिप भोसले, सचिव, राजेंद्र जगताप, सखाराम जगताप, विक्रम जाधव, दिलीाप चव्हाण, सोनू जाधव, शिवा कठाळे, सल्लागार संतोष गागरे, राजेंद्र मराठे, गोरख कठाळे, महादू थोरात, अशोक कोकाटे, दादा गागरे, जिभू गागरे, नितीन जाधव, केशव कठाळे, विठोबा जाधव यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.