शिरपूर : शहरातील सावित्रीबाई व्यंकटराव रंधे कन्या शाळेतील स्काऊट-गाईडच्या मुलींनी वृक्षदिंडी काढून पर्यावरणाबाबत जनजागृती केली. प्रत्येकाने आपापल्या घरासमोर झाडे लावण्याचे आवाहनही केले़शाळेतील इयत्ता ६ वी व ७ वी च्या स्काऊट गाईडच्या मुलींनी वारकºयांच्या वेशभूषेत दिंडीत सहभाग नोंदविला. पालखीसह तुळशी वृंदावन व रोपे डोक्यावर घेवून वृक्षदिंडी काढण्यात आली. वृक्षदिंडीचे उद्घाटन शाळेच्या प्राचार्या मंगला पावरा यांच्याहस्ते करण्यात आले़ यावेळी मुलींनी पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लावण्याबाबत फलकाद्वारे जनजागृती केली. तसेच पर्यावरण संवर्धनासंदर्भात घोषणा देऊन लोकांचे लक्ष वेधून घेतले़यावेळी सारीका रंधे, उपमुख्याध्यापिका उषा पाटील, पर्यवेक्षक जेक़े़ सोनवणे, गाईड कॅप्टन संध्या जगदेव, कल्पना ईशी, पातुरकर, स्मिता कोठारी, निलेश देसले यांच्याहस्ते शाळेच्या प्रांगणात विविध जातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षदिंडी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्काऊट-गाईडस्च्या मुली व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
वृक्षदिंडीतून पर्यावरण जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 22:11 IST