मालपूर परिसरात पोळा सणाचा उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:43 IST2021-09-08T04:43:15+5:302021-09-08T04:43:15+5:30
पोळा सणाला शेतकरी बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. तसेच शेतकरी-शेतमजूर एकत्रित येऊन सोबत हा सण साजरा करतात. शेती अवजारांसह शेतशिवारात ...

मालपूर परिसरात पोळा सणाचा उत्साह
पोळा सणाला शेतकरी बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. तसेच शेतकरी-शेतमजूर एकत्रित येऊन सोबत हा सण साजरा करतात. शेती अवजारांसह शेतशिवारात जाऊन तेथील देवतेचे मनोभावे पूजन करतात. यामुळे दिवसभर ग्रामीण भागातील गावे व शेतशिवार गजबजलेले असतात. पोळ्यानिमित्त गावातील ग्रामदैवत पवनपुत्र हनुमानाला शेंदूर लेपन करुन, तेल-शेंदूर चढविण्यात आला. दिवसभर बैलांना वैरण घालून आंघोळ घालण्यात आली. तसेच नवीन आणलेल्या नाथा, मोरक्या, शिरधा तसेच ठेवणीतली खास साज शृंगाराचे साहित्य त्यांच्यावर चढवून शिंगांना रंगरंगोटी करण्यात आली. गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. घरोघरी सुवासिनींनी बैलांचे पूजन केले. घरातील देव्हाऱ्याजवळ मातीच्या बैलांना नैवेद्य दाखवून पूजन करण्यात आले. सकाळी शेळ्या-मेंढ्यांची मिरवणुकीची परंपराही येथे कायम असून राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाजवळ मानमानता फेडली जाते.