ट्रकने दिलेल्या धडकेत पादचा-याचा जागीच अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 12:28 IST2018-02-14T11:58:02+5:302018-02-14T12:28:22+5:30
लौकी येथील पहाटेची घटना : जागीच करूण अंत

ट्रकने दिलेल्या धडकेत पादचा-याचा जागीच अंत
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : भरधाव वेगाने येणाºया ट्रकने पादचाºयाला जोरदार धडक दिली़ या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे लौकी ता़ शिरपूर येथे घडली़
शिरपूर तालुक्यातील सुळे येथे राहणारे भाईदास काळू पावरा यांनी फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, मुंबई आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील लौकी फाटा येथे एमपी ०९ जीएफ २५५४ क्रमांकाचा ट्रक शिरपूरकडून सेंधवाकडे भरधाव वेगात जात होता़ या ट्रकने शिरपूर तालुक्यातील सुळे येथे राहणारे रुपसिंग गज्या पावरा (५२) यांना जोरदार धडक दिली़ त्यात त्यांना जबर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला़ याप्रकरणी सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ट्रकचालक मोईल आशिक मन्सुरी (रा़ धामनोद ता़ सेंधवा जि़ बडवानी, मध्यप्रदेश) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला़