महापालिकेच्या मॉडेल रोडवर पुन्हा अतिक्रमणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 12:32 PM2020-11-26T12:32:31+5:302020-11-26T12:32:45+5:30

 लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : शहरातील संतोषी माता ते दसेरा मैदान पर्यतच्या रस्ते कामांसाठी शासनाकडून दहा कोटीचा निधी खर्च ...

Encroachment on Municipal Model Road again | महापालिकेच्या मॉडेल रोडवर पुन्हा अतिक्रमणाचा विळखा

dhule

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील संतोषी माता ते दसेरा मैदान पर्यतच्या रस्ते कामांसाठी शासनाकडून दहा कोटीचा निधी खर्च करून हा रस्ता मनपाकडून मॉडलरोड तयार करण्यात आलेला आहे. मात्र अतिक्रमण धारकांचे पुर्णवसनाचा प्रश्न न सुटल्याने पुन्हा या ठिकाणी अतिक्रमण होत आहे.
मनपाकडून शिवतीर्थे ते दसेरा मैदान पर्यंतचा रस्ता मॉडेल रोड तयार करण्यात येत आहे. या कामसाठी शासनाकडून दहा कोटींचा निधी दोन वर्षापूर्वी मंजूर झाला होता. या रस्त्याचे काम दोन वर्षापासून सुरु आहे. या दोन किलोमीटरच्या रस्त्यावर यापुर्वी ३५० घरांचे अतिक्रमण होते. न्यायालयाच्या आदेशाने येथील अतिक्रमण काढण्यात आले होते. मात्र अतिक्रमण धारकांचा पुर्नवसनाचा प्रश्न न सुटल्याने या रस्त्यालगत पुन्हा ७७ नागरिकांनी तर १० व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत.
मनपाकडून अतिक्रमण धारकांचा प्रश्न सोडविल्याशिवाय हा मॉडेल रोड तयार होणार नाही. या रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण होण्यास सुरवात झालेली आहे. त्यामुळे पुन्हा वाहतूकीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
झोपड्याचे अतिक्रमण सर्वाधिक
रस्त्यावरील अतिक्रमण काढल्यानंतर हा रस्ता मोकळा झालेला होतो. त्यानंतर रस्त्याचे काम होण्यापुर्वी गॅरेज, हॉटेल, पान टपरी तसेच किराणा व लहान व्यवसायिकांनी दुकाने लावली होती. मात्र रस्त्याचे काम झाल्यानंतर अनेक रहिवाशांनी झोपडी तयार करून राहण्यास सुरूवात केली आहे.

Web Title: Encroachment on Municipal Model Road again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.