रूग्णसेवेसाठी आयुर्वेद रूग्णालय सक्षम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 23:18 IST2020-06-10T23:18:05+5:302020-06-10T23:18:43+5:30
कोरोना बाधित रूग्ण : महासभेत नगरसेवकांची मागणी, अक्कलपाडा योजनेचे काम प्रगतीपथावर

dhule
धुळे : जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्येत वाढ आहे़ रूग्णांवर उपचार होण्यासाठी महापालिकेचा आयुर्वेद रूग्णालय सक्षम करण्याकडे प्रयत्न करण्याची गरज आहे़ अशी मागणी महासभेत सदस्यांनी मांडली़
पारोळारोडवरी छत्रपती राजश्री शाहू महाराज नाट्य मंदिरात बुधवारी दुपारी महासभा घेण्यात आली़ यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजिज शेख, नगरसचिव मनोज वाघ, स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, नगरसेवक हिरामन गवळी, अमोल मासुळे, आदीसह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते़ महासभेत कोरोना बाधितांची संख्येत वाढ होत असल्याने अत््यावश्यक उपाय-योजना करण्यासाठी मनपा ने करावयाच्या उपाय-योजना संदर्भात सदस्यांनी आप-आपली मते मांडली़ यावेळी महापौर चंद्रकांत सोनार म्हणाले की, शहरासाठी सद्य स्थितीत असलेली पाणीपुरवठा यंत्रणा ३० वर्षापुर्वीची आहे़ एकीकडे शहराचा वाढता विस्तार वाढत असल्याने पाणी वितरणात अडचणी येतात़ मनपाच्या फिल्डवर काम करणारे ओव्हरसियर व होलमनकडून तक्रारींवर कार्यवाही न झाल्याने पाणी पुरवठा वितरणास विलंब होतो़ त्यांनी वेळीच याबाबत लक्ष देण्याची गरज आहे़ यापुढे कोणत्याही स्वरूपाची हलगर्जी सहन केली जाणार नाही़ आपली पाणीपुरवठा योजना अधिक सक्षम व प्रभावी कशी करता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे़ केंद्र व राज्य शासनाकडून अक्कलपाडा योजनेसाठी अनुदान प्राप्त झाले आहे़ त्यातून अक्कलपाडा योजनेचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. वर्षभरात हे काम पुर्ण झाल्यास धुळेकरांना दररोज पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. ही योजना यंत्रणा सक्षम करण्यासाठी व संपूर्ण शहराचे वॉटर आॅडिट सर्वेक्षण करण्यासाठी तज्ञ सल्लागार संस्था नियुक्त करा अशा सुचना महापौर सोनार यांनी प्रशासनाला दिल्यात़
यावेळी सभापती सुनील बैसाणे म्हणाले की, महापालिकेत आयुर्वेद रूग्णालय आहे़ ते रूग्णालय सक्षम करण्यासाठी खासदार डॉ़ सुभाष भामरे यांची माध्यमातून प्रयत्न करण्याची गरज आहे़ आयुष मंत्रालयाकडून २००० कोेटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे़ हा निधी मिळण्यासाठी खासदार डॉ़ भामरे यांच्या माध्यमातून प्रयत्न करावा़ मनपा आयुर्वेद रूग्णालय सक्षम झाल्यास कोरोना बाधितांवर उपचार करता येवू शकतात असे सभापती बैसाणे यांनी सांगितले़
नगरसेवक हर्षकुमार रेलन म्हणाले की, माझ्या प्रभागात कोवीड सेंटर सुरू आहे़ मात्र केंद्रात समन्वय नसल्याने दररोज २०० रूग्णांची तपासणी झाली पाहीजे मात्र होत नाही़ तसेच या ठिकाणी निशुक्क सेवा देणाऱ्या डॉक्टरांना पीपीई किटची देण्यात आलेली नाही़ तर परिचालिकांना देखील साहित्य मिळत नाही़ त्यामुळे महापालिकेचे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे़ शहरातील प्रभाग एक मध्ये मनपाकडून थर्मल स्कॅनिग सेंटर उभारण्यात आले होते़ मात्र ते तात्पूती होते़
आता ज्यांना थर्मल स्कॅनिंग करण्यासाठी जिल्हा रूग्णालयात जावे लागते़ यासाठी माझ्या प्रभागात कायमस्वरूपी थर्मल स्कॅनिंग सेंटर उभारावे अशी मागणी नगरसेविका वंदना भामरे यांनी