तरुणाच्या मृत्यूनंतर राजीवनगरात तणाव

By Admin | Updated: July 5, 2017 16:37 IST2017-07-05T16:37:46+5:302017-07-05T16:37:46+5:30

तंबाखू पुडीवरुन वाद. चार संशयित घेतले ताब्यात

Emergency after the death of the king | तरुणाच्या मृत्यूनंतर राजीवनगरात तणाव

तरुणाच्या मृत्यूनंतर राजीवनगरात तणाव

ऑनलाईन लोकमत

धुळे ,दि.5 - तंबाखुच्या पुडीवरुन मंगळवारी रात्री राजीवनगरात झालेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आह़े बुधवारी संशयित चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणातील एका आरोपीचे घर जाळण्यात आले आह़े या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आह़े
साक्री रोडवरील राजीवनगर भागात तंबाखुच्या पुडीवरुन झालेल्या वादाचे पर्यावसान थेट हाणामारीत झाल़े या हाणामारीत संदीप ठाकूर या युवकाचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला होता़ त्यानंतर रात्रीतून चौघां संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आह़े याप्रकरणी चौकशी सुरु असून दुपार्पयत गुन्हा दाखल झालेला नव्हता़ या भागात बुधवारी पोलिसांचा बंदोबस्त असल्याने तणावाची स्थिती कायम आह़े 
संशयिताचे घर जाळले 
साक्री रोडवरील राजीवनगरात मंगळवारी रात्री झालेल्या मारहाण प्रकरणातील संशयिताचे घर जाळण्यात आले आह़े त्यामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले आह़े 

Web Title: Emergency after the death of the king

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.