कामगार, कर्मचाऱ्यांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 22:07 IST2020-08-10T22:07:13+5:302020-08-10T22:07:31+5:30
निदर्शने : जुन्या पेन्शनसह विविध मागण्याचे निवेदन

कामगार, कर्मचाऱ्यांचा एल्गार
धुळे : खाजगीकरणाला विरोध, कामगार व कर्मचारी विरोधी कायदे रद्द करणे यासाठी देशातील प्रमुख संघटनांनी ९ ते ११ आॅगस्ट असे तीन दिवस देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे़
त्यानुसार धुळे येथे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी क्युमाईन क्लब जवळ दुपारी निदर्शने केली़ जिल्हाधिकाºयांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले़
पीएफ आरडीए अंतर्गत अंशदायी पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागू करावी, बदली, कंत्राटी तथा मानधनावरील कर्मचाºयांना सेवेत नियमीत करावे, रिक्त पदे त्वरीत भरावीत आणि त्यात अनुकंपा धारकांना प्राधान्य द्यावे, महागाई भत्ता गोठविण्याचे धोरण रद्द करुन जुलै २०१९ पासून अद्ययावत महागाई भत्ता मागील फरकासह देण्याचा निर्णय घ्यावा, सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता एक वर्षासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय त्वरीत रद्द करावा, वेतनत्रुटी संदर्भातील बक्षी समिती खंड दोन त्वरीत प्रकाशित करावा, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करावे, महामारीच्या काळात उत्कृष्ट सेवा बजावणाºया कर्मचाºयांचा गोपनिय अहवाल आणि सेवापुस्तकात तशी नोंद घ्यावी व आगाऊ वेतनवाढ द्यावी, यंदा केवळ विनंती बदल्या आणि पती पत्नी एकत्रिकरण बदल्यांचा विचार करावा, कोवीड १९ चे काम करणाºया कर्मचाºयांना सुरक्षेची सर्व साधने उपलब्ध करुन द्यावी, विम्याला मुदतवाढ द्यावी, आरोग्य सेवेतील कर्मचाºयांचा क्वारंटाईन कालावधी राज्यभर एकसारखा असावा, कामाचा ठिकाणी निवास व भोजनाची व्यवस्था करावी आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत़
निवेदनावर डॉ़ संजय पाटील, अशोक चौधरी, सुधीर पोतदार, शेख मन्सुरी, उज्वल भामरे, कल्पेश माळी, संजय कोकणी, वाल्मिक चव्हाण, नागेश कंडारे, एस़ यु़ तायडे आदींच्या सह्या आहेत़