अनियमित वीज पुरवठा व वाढीव बिलासंबंधी शिवसैनिकांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 12:47 IST2020-03-21T12:46:41+5:302020-03-21T12:47:09+5:30
कृषी रोहित्र सदोष : पाण्याअभावी पिके हातची जाण्याची भिती

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : शहरात काही दिवसां पासून विजेचा अनियमित पुरवठा होत असून विजेच्या होणाऱ्या लपंडावामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहे. त्याचप्रमाणे दिले जाणारे वाढीव बील या मुळे ग्राहकांची आर्थिक लूट होत असून ही बाब अत्यंत गंभीर आहे. विषयी तात्काळ कृती करावी, असे निवेदन शिंदखेडा शिवसेनेतर्फे वीज वितरण कंपनीचे उपअभियंता जयवंत बोरसे यांना देण्यात आले.
अनियमित वीजपुरवठा व वाढीव बिलांबाबत योग्य दखल न घेतल्यास शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. कृषी पंपासाठीचे रोहित्र सदोष असून तसेच अनेक ठिकाणी कटाऊट नाहीत म्हणून शेतकऱ्यांना याचा धोका होऊ शकतो. अनेक शेतकरी तक्रार करीत आहेत मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. वीज पुरवठा कमी दाबाने दिला जात असल्याने त्यामुळे कृषि पंप चालत नाही. शेवटच्या पाण्याअभावी पिके वाया जाण्याची वेळ शेतकºयावर आली असल्याने रोहित्र तात्काळ दुरुस्ती करावे अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल. तसेच होणºया परिणामास वीज वितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी जबाबदार राहतील असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे.
यावेळी संतोष देसले, नंदकिशोर पाटील, सागर देसले, संतोष ठाकूर, भुपेंद्र देशमुख, शोएब शेख, आकाश चौधरी, शांतीलाल माळी, नाना पहाडी, भटू पाटील, जंगलू कसबे, भास्कर कसबे उपस्थित होते.